घरदेश-विदेशवेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान; काँग्रेसची टीका

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान; काँग्रेसची टीका

Subscribe

वेदांता फॉक्सकॉन कंपनीच्या अहवालामध्ये महाराष्ट्रातील तळेगाव हे ठिकाण सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी योग्य जागा होती. त्यासाठी महाराष्ट्रातील तळेगाव आणि गुजरात मधील ढोलेरा या दोन्ही ठिकाणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला होता.

सध्या संपूर्ण राज्यभरात वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत झालेल्या बदलांमुळे वाद सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राजकीय क्षेत्रात तसेच सामान्य नागरिकांमध्ये देखील संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, याबाबत आता राजकीय क्षेत्रातील नेत्यांच्या प्रतुक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. वेदांता फॉक्सकॉन या प्रकल्पामुळे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर देशाचेही मोठे नुकसान झाले आहे. असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. गुजराजमधील ढोलेरा हे ठिकाण अव्यवहार्य असून त्या ठिकाणाहून आधीच अनेक कंपन्यांनी काढता पाय घेतला आहे. असे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिम सावंत यांनी सांगितले आहे.

वेदांता फॉक्सकॉन कंपनीच्या अहवालामध्ये महाराष्ट्रातील तळेगाव हे ठिकाण सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी योग्य जागा होती. त्यासाठी महाराष्ट्रातील तळेगाव आणि गुजरात मधील ढोलेरा या दोन्ही ठिकाणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला होता. यावेळी गुजरातमधील ढोलेरा येथे पाण्याची कमतरता, उत्तम कामगारांची कमतरता, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन नसणे अश्या अनेक समस्या ढोलेरा येथे दिसून येत होत्या. मात्र, असं असताना देखील महाराष्ट्राने गुजरातपेक्षा अधिक सवलती देऊनही अचानक हा प्रकल्प ढोलेरा येथे नेण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या दबावाखाली येऊन केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

- Advertisement -

येत्या काळात हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सुरू झाला असता आणि यामुळे महाराष्ट्रातील तरूणांना रोजगार मिळाला असता. देशाला उपन्न मिळाले असते. मात्र केंद्र सरकारच्या दबावाखाली या प्रकल्पाला ढोलेरा येथे नेण्यात आले. त्यामुळे आता महाराष्ट्रासोबतच देशालाही मोठे नुकसान भोगावे लागू शकते.

 

- Advertisement -

हेही वाचा :

वेदांता-फॉक्सकॉन राज्याबाहेर गेल्यानंतर सरकारचे Tata-Airbus प्रकल्पासाठी प्रयत्न

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -