घरदेश-विदेशआज शुक्रतारा दिसणार अधिक प्रखर; ८ वर्षांनंतर पृथ्वीच्या अधिक जवळ!

आज शुक्रतारा दिसणार अधिक प्रखर; ८ वर्षांनंतर पृथ्वीच्या अधिक जवळ!

Subscribe

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासूनच हा तारा आकाशाच्या पश्चिमेस चमकताना दिसत आहे.

आकाशात चंद्र आणि सूर्यानंतर शुक्र ग्रह सर्वाधिक तेजस्वी दिसतो. लॉकडाऊनमुळे देशातील वायू प्रदूषणाचा स्तर घटल्याने हा तेजस्वी शुक्र ग्रह पाहणे आणखी सोपे होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्र हा ग्रह 28 एप्रिल रोजी अधिक तेजस्वी आणि प्रखर दिसणार आहे. शुक्र ग्रहाला शुक्रतारा असे देखील संबोधले जाते. सूर्य आणि चंद्रानंतरचा सर्वात तेजस्वी प्रखर प्रकाशमान असणारा हा तारा असून जेव्हा आकाश स्वच्छ असेल तेव्हाच हा तारा बघणं सहज शक्य होते. कारण शुक्रतारा सूर्यापासून सर्वात लांब आणि पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे. अधिक प्रखर असल्याने आकाशातील ताऱ्यांपैकी हा तारा सहज ओळखता येतो. यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासूनच हा तारा आकाशाच्या पश्चिमेस चमकताना दिसत आहे.

- Advertisement -

स्पेस डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, रात्री आकाशात चंद्रानंतर प्रखर दिसणाऱ्या ताऱ्यांपैकी शुक्रतारा हा एक तेजस्वी तारा आहे. मंगळवारी रात्री हा तारा आपल्या प्रतिस्पर्धी ग्रह बृहस्पतिपेक्षा नऊपटीने अधिक प्रखऱ दिसणार आहे. 27 एप्रिलरोजी प्रमाण वेळेनुसार रात्री 9 वाजता शुक्र तारा सर्वात तेजस्वी दिसला होता. त्यानंतर मंगळवारी 28 एप्रिल रोजी सर्वच ठिकाणी रात्री एक वाजता अधिक तेजस्वी आणि प्रखर दिसणार आहे.

यावेळी, आकाशातील सर्वच ताऱ्यांमध्ये शुक्र ग्रह खूप तेजस्वी दिसणार असून या आठवड्यानंतर तो पुन्हा एकदा धुसर दिसण्यास सुरूवात होईल तर मे महिन्याच्या अखेरीस सूर्यप्रकाशामध्ये तो अदृश्य होईल. यानंतर, जूनमध्ये पुन्हा एकदा जूनमध्ये मॉर्निंग स्टार सारखा हा शुक्र तारा दिसेल.


अंतराळातून पृथ्वीवर येतेय मोठी अपत्ती; अवघे काहीच तास शिल्लक!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -