घरदेश-विदेशनव्या पेन्शन वितरण प्रणालीतील त्रुटी CGDA कडून दूर; सेवानिवृत्त सैनिकांना मिळणार दिलासा

नव्या पेन्शन वितरण प्रणालीतील त्रुटी CGDA कडून दूर; सेवानिवृत्त सैनिकांना मिळणार दिलासा

Subscribe

भारताच्या कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाऊंट्स (CGDA) द्वारे सांगण्यात आले की, सरकारच्या नवीन पेन्शन वितरण प्रणालीतील त्रुटी दूर करण्यात आली आहे. ज्यामुळे शेकडो सेवानिवृत्त सैनिकांना दिलासा मिळणार आहे.

नव्या पेन्शन वितरण प्रणालीतील त्रुटींमुळे थ्री स्टार सेवानिवृत्त सैनिकांना त्यांच्या सेवानिवृत्ती उत्पन्नाचा एक महत्वाचा घट असलेली महागाई मदत (DR) दिली गेली नव्हती. अशी माहिती बातमी दोन दिवसांपूर्वी हिंदुस्तान टाइम्सने दिली होती.

- Advertisement -

यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या CGDA ने महागाई मदत (DR) भत्ता जमा झाल्याचे सांगितले. बँकिंग डेटा पॉलिसीतील त्रुटींमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे नंतर CGDA जाहीर केले.

जानेवारी 2022 मध्ये केंद्राच्या #SPARSH योजनेद्वारे जवळपास 5 लाख मासिक पेन्शन रक्कम यशस्वीरित्या वितरित केले गेले. मात्र बँकिंग डेटा सिस्टममध्ये त्रुटी निर्माण झाल्याने 1048 सेवानिवृत्त सैनिकांच्या अकाऊंटमध्ये महागाई भत्ता जमा करण्यात अडचणी आल्या. परंतु या त्रुटीदूर करून 48 तासांच्या आत या सेवानिवृत्त सैनिकांना वेळेत दिल्याचे सांगितले. यानंतर कार्यक्षम. प्रभावी. डिजिटल,” असं ट्विट CGDA ने केले आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मूळ वेतनाच्या किंवा पेन्शनच्या 31 टक्के बरोबरीने DR मिळण्याचा हक्क आहे. मात्र या त्रुटींमुळे असे होत होते की, निवृत्त कर्नलांना नेहमीच्या तुलनेत सुमारे ₹ 31,000 कमी पगार मिळत होता तर माजी लेफ्टनंट जनरल्सना सुमारे ₹ 37,000 कमी पगार मिळत होता.

दरम्यान त्या बातमीनंतर चार माजी थ्री-स्टार जनरल ऑफिसर यांच्या बँक अकाऊंटमध्ये शनिवारी संध्याकाळी DR ची रक्कम त्वरीत जमा झाली. दरम्यान या पेन्शन पॉलिसीमध्ये कोणताही फेरफार करण्याची गरज नसल्याचे आता सांगण्यात येत आहे. पेन्शन पॉलिसीमध्ये आलेल्या त्रुटी आता दूर करण्यात आल्या आहे. केंद्र सरकारद्वारे नवीन ऑनलाईन पेन्शन वितरण पॉलिसी स्विच केल्यानंतर आता अलाहाबादस्थित प्रधान नियंत्रक संरक्षण लेखा (पेन्शन) द्वारे अनेक गोष्टींवर काम केले जात आहे.

केंद्राच्या SPARSH या ऑनलाईन अॅपद्वारे किंवा सिस्टम फॉर पेन्शन अॅडमिनिस्ट्रेशन (रक्षा) ऑनलाईन पोर्टलद्वारे कोणत्याही बाह्य मध्यस्थांवर (बँकांवर) अवलंबून न राहता माजी सैनिकांच्या खात्यात पेन्शन रक्कम जमा केली जात होती. मात्र 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागला कारण पेन्शनधारकांची माहिती नव्या प्रणालीत अपलोड केली जात आहे.

PCDA (P) नुसार, स्पर्श या ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्वसमावेशक पेन्शन पॅकेज, एक एंड-टू-एंड ऑनलाइन प्रणाली, तीन मिलियन पेक्षा जास्त पेन्शनचच्या डिजीटल प्रोसेसिंगद्वारे योग्य वेळी रक्कम केली जाते. PCDA (P) म्हणते की, पेन्शन मंजूरी आणि वितरण प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी आणि त्या समजून घेण्यासाठी SPARSH ची मदत झाली.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -