घरदेश-विदेशVetri Duraisamy : तमिळ दिग्दर्शक वेत्री दुराईसामी यांचं अपघाती निधन! नऊ दिवसांनंतर...

Vetri Duraisamy : तमिळ दिग्दर्शक वेत्री दुराईसामी यांचं अपघाती निधन! नऊ दिवसांनंतर सापडला मृतदेह

Subscribe

हिमाचल प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय वेत्री दुराईसामी हे 4 फेब्रुवारी रोजी बेपत्ता असल्याचं वृत्त समोर आलं होतं. ज्या कारमधून ते प्रवास करत होते त्या कारचा किन्नौरमध्ये अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की, कार रस्त्यावरुन थेट सतलज नदीमध्ये गेली. यामध्येच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

नवी दिल्ली : मागील नऊ दिवसांपासून बेपत्ता असलेले तामिळ दिग्दर्शक वेत्री दुराईसामी यांचा अखेर मृतदेहच सापडला. ते चेन्नई महानगर पालिकेचे माजी महापौर सिदाई एस. दुराईसामी यांचे पुत्र होत. दिग्दर्शक वेत्री दुराईसामी यांचा मृत्यू हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात झाला. त्यांच्या कारचा अपघात झाल्याने त्याचं निधन झालं असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (Vetri Duraisamy Tamil director Vetri Duraisamy passed away accidentally He was found dead nine days later)

हिमाचल प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय वेत्री दुराईसामी हे 4 फेब्रुवारी रोजी बेपत्ता असल्याचं वृत्त समोर आलं होतं. ज्या कारमधून ते प्रवास करत होते त्या कारचा किन्नौर जिल्ह्यामध्ये अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की, कार रस्त्यावरुन थेट सतलज नदीमध्ये गेली. यामध्येच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या कारमधून दिग्दर्शक वेत्री दुराईसामी, गोपीनाथ स्पिती आणि स्थानिक व्यक्ती तेन्झिन नावाच्या व्यक्ती असे तिघे प्रवास करत होते. या अपघातात गोपीनाथ स्पिती गंभीर जखमी झाला असून, चालक तेन्झिनचा जागीच मृत्यू झाला. तर दिग्दर्शक वेत्री दुराईसामी यांचा मृतदेह सतलज नदीच्या पाण्यात वाहून गेला होता.

- Advertisement -

अपघातानंतर माजी महापौर सिदाई एस. दुराईसामी मुलाला शोधण्यासाठी स्थानिक लोकांना मदतीचे आवाहन केले होते. वेत्रीच्या कुटुंबीयांनी त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याना एक कोटी रुपयांचे बक्षिसही जाहीर केले होते. दुराईसामी यांनी केलेल्या आवाहनानंतर इंडो-तिबेट सीमा पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, उत्तराखंड राज्य आपत्ती प्रतिसाद दल, होमगार्ड आणि माहुन नाग असोसिएशनच्या डायव्हर्स यांनी संयुक्त शोध मोहीम राबविली. या शोध मोहिमेत वेत्री यांचा मृतदेह आढळून आला. वेत्री हे चित्रपट दिग्दर्शक होते. 2021 मध्ये विधार्थ आणि रम्या नंबीसन यांचा समावेश असलेला त्यांचा ‘एन्द्रावथु ओरू नाल’ चित्रपट प्रदर्शित झाला.

हेही वाचा : Politics : राज्यसभेसाठी शरद पवारांचा नवा मास्टरस्ट्रोक; ‘या’ उमेदवाराचा प्रस्ताव मांडला

- Advertisement -

चित्रपटासाठी लोकेशन पाहण्यासाठी गेले होते शिमल्याला

मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक वेत्री दुराईसामी हिमाचलमध्ये चित्रपटाच्या शूटसाठी लोकेशन शोधण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते लोकेशन पाहून किन्नौरला पोहोचले. दरम्यान चालक तेन्झिनला गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्याचे चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली. वेत्रीच्या पुढच्या चित्रपटासाठी दिग्दर्शक आणि गोपीनाथ शिमल्यात गेले होते.

हेही वाचा : Ramesh Chennithala : चव्हाणांनी सांगायला हवं त्यांच्यावर कुठला दबाव आहे; चेन्नीथला यांचं आव्हान

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला

वेत्री दुराईसामी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला आहे. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -