Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या ट्विटर अकाऊंट वरील हटवण्यात आलेली Blue tick परत आली

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या ट्विटर अकाऊंट वरील हटवण्यात आलेली Blue tick परत आली

#व्यंकय्यानायडू सध्या ट्विटरवर ट्रेडिंगमध्ये

Related Story

- Advertisement -

भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu ) यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टिक (Blue tick ) हटवण्यात आली होती. महत्त्वाच्या व्यक्तींच्या ट्विटर अकाऊंटला ट्विटकडून ब्लू टिक देण्यात येते. ब्लू टिकचा अर्थ ते अकाऊंट व्हेरिफाइड आहे असा होतो. मात्र ट्विटरने अचानक त्यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक काढून टाकल्याने अनेकांनी ट्विटरवर टीका करायला सुरुवात केली. ‘उपराष्ट्रपती हे पद भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे. घटनात्मक पदावर असलेली व्यक्ती कोणत्याही पक्षाचा भाग नसते. त्यामुळे ट्विटरवर उपराष्ट्रपतींचे अकाऊंट अनव्हेरिफाईड करणे हा घटनेचा अनादर करण्यासारखे आहे’, असे सरकारकडून सांगण्यात आले. त्यानंतर ट्विटरने आपली चूक मान्य करत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे अकाऊंट पुन्हा व्हेरिफाईड करुन अकाऊंटवरील ब्लू टिक परत देण्यात आली. ट्विटर वापरकर्त्यांच्या माहितीनुसार, उपराष्ट्रपतींचे ट्विटर अकाऊंट गेल्या अनेक दिवसांपासून अँक्टिव्ह नव्हते. त्यामुळे त्यांचे अकाऊंट अनव्हेरिफाईड करण्यात आले. अनेक दिवसांपासून ट्विटर लॉग इन न केलेल्या संघातील अनेक नेत्यांचे अकाऊंट ट्विटरने अनव्हेरिफाईड केले आहेत. ( Vice President Venkaiah Naidu Twitter account Blue tick has returned)


ट्विटरने उपराष्ट्रपतींच्या अकाऊंटवरील ब्लू टिक कशी काढली? हा भारतीय घटनेवर केलेला हल्ला आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे नेते सुरेश नाखुवा यांनी व्यक्त केली. उपराष्ट्रपती त्याचप्रमाणे अनेक RSSच्या नेत्यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक हटवण्यात आली आहे. अकाऊंट अनव्हेरिफाईड करण्यामागची कारणे ट्विटरने दिली असली तरीही हे प्रकरण इतक्या लवकर संपेल असे वाटत नाही. कारण याआधीही ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. पुन्हा एकदा ट्विटरच्या वागण्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ट्विटरने उपराष्ट्रती नायडू यांचे अकाऊंट अनव्हेरिफाईड केल्यानंतर त्यावर अनेक युझर्सच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. #व्यंकय्यानायडू सध्या ट्विटरवर ट्रेडिंगमध्ये आहे. अनेक जण या प्रकरणाला वेगळा रंग देत आहेत.

- Advertisement -

ट्विटरने दिलेल्या काही अटींनुसार, एखादा युझर त्याचे हँडल नेम बदलत असले,किंवा बऱ्याच दिवसांपासून त्याने अकाऊंट लॉग इनच केलेले नसल्यास ट्विटर त्या व्हेरिफाईड केलेल्या अकाऊंटवरील ब्लू टिक काढून टाकते. त्याचप्रमाणे एखाद्या बड्या अधिकाऱ्याच्या ट्विटर हँडलसमोर ब्लू टिक देण्यात आली असले तर त्या अधिकाऱ्याने त्याचे कार्यालय सोडल्यास त्याचप्रमाणे व्हेरिफिकेशनचे सर्व नियम पूर्ण होत नसतील तर त्यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक ट्विटरकडून हटवण्यात येते.


हेही वाचा – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फेसबुकने घातली दोन वर्षांची बंदी 

- Advertisement -

 

 

- Advertisement -