देशाचे नवे उपराष्ट्रपती जगदीप धनखड; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन

एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांची देशाच्या उपराष्ट्रपती निवड झाली आहे. जगदीप धनखड यांचा 528 मतांनी विजय झाल्याचे समजते. मात्र, या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यूपीएच्या मार्गारेट अल्वा यांचा पराभव झाला आहे.

एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांची देशाच्या उपराष्ट्रपती निवड झाली आहे. जगदीप धनखड यांचा 528 मतांनी विजय झाल्याचे समजते. मात्र, या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यूपीएच्या मार्गारेट अल्वा यांचा पराभव झाला आहे. मार्गारेट अल्वा यांना 182 मते मिळाली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जगदीप धनखड यांची भेट घेत त्यांचे अभिनंदम केले. (vice presidential election result Nda Jagdeep Dhankhar Beat Oppositions Candidate Margaret Alva)

भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा देखील धनखड यांची भेटी घेणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपाठोपाठ उपराष्ट्रपती निवडणुकीत देखील भाजपाप्रणित रालोआने विजय मिळवला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण 725 खासदारांनी मतदान केले. मतदानावेळी 710 मते वैध ठरली तर 15 मते अवैध ठरली आहेत.

दरम्यान, लोकसभा आणि राज्यसभा असे मिळून भाजपचे 394 खासदार आहेत. त्याशिवाय जदयू, अण्णा द्रमुक, लोकजनशक्ती पार्टी, एकनाथ शिंदे समर्थक खासदार, बीजेडी, वायएसआर काँग्रेस, बसपा, अकाली दल, टीडीपी यांनीही पाठिंबा दिला होता. त्यामुळे कागदावर जगदीप धनखड यांना 527 खासदारांची मते मिळणार असल्याचे दिसून येत होते. यामुळेच एनडीचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय निश्चित मानला जात होता.

दरम्यान, या निवडणुकीत टीएमसीने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीत टीएमसीच्या 34 खासदारांनी मतदान केले नाही. त्याशिवाय, भाजपच्या 2, समाजवादी पार्टीचे 2 आणि शिवसेना आणि बसपाच्या एका खासदाराने मतदान केले नाही. मात्र, तृणमूल काँग्रेसच्या 2 खासदारांनी पक्षादेश डावलून मतदान केले. शिशिर अधिकारी आणि दिब्येंदू अधिकारी मतदान केल्याचे बोलले जात आहे.

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा दणदणीत विजय झाला. मुर्मू यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलैला मतदान झाले होते. त्यानंतर गुरुवारी झालेल्या मतमोजणीत द्रौपदी मुर्मू यांना 812, तर यशवंत सिन्हा यांना 521 मते मिळाली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 71.29 टक्के मते मिळाली. एकूण 10,58,980 मूल्यांच्या 4701 वैध मतांपैकी त्यांना 6,76,803 मूल्याची 2824 मते मिळाली. महाराष्ट्रातून त्यांना 31,675 मूल्यांची मते मिळाली.


हेही वाचा – द्रौपदी मुर्मू देशाच्या १५व्या राष्ट्रपती