मणिपूर हिंसाचारावरून (Manipur Violence) लोकसभेत मोदी सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास प्रस्ताव आज (10 ऑगस्ट) फेटाळण्यात आला आहे. मणिपूरप्रकरणी पंतप्रधानांनी बोलावं, अशी विरोधकांची मागणी होती आणि यासाठीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. दरम्यान, आज मोदींनी सभागृहात भाषण करताना विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. याच भाषणावर आता विरोधकांकडूनही टीका करण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. (VIDEO 90 percent spoke on INDIA in the one and a half hour speech First reaction from NCP on Prime Ministers speech)
हेही वाचा – आवाजी मतदानाने मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला
पंतप्रधान मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींनी मणिपूर आणि त्याठिकाणी महिलांवर झालेल्या अत्याचारावर बोलावं, अशी आमची इच्छा होती. त्यांनी अर्थव्यवस्था, महागाई किंवा बेरोजगारी बोलावं अशी आमची अपेक्षा होती. परंतु त्यांनी केलेल्या दीड तासांच्या भाषणात 90 टक्के ते फक्त ‘इंडिया’वर बोलले, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेथी बोलताना केली.
#WATCH | NCP leader Supriya Sule says, “We expected him (PM Modi) to speak on economy, inflation, unemployment, Manipur, issue of brutalities on women of Manipur but in one and a half hour 90% of his speech was on I.N.D.I.A…”. pic.twitter.com/uZdSCaw9W6
— ANI (@ANI) August 10, 2023
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
आज लोकसभेत केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, विरोधी पक्षाला स्वत:ला जीवंत ठेवण्यासाठी एनडीएचा आधार घ्यावा लागतो आणि ही त्यांची समस्या आहे. पण अभिमानाचा आय त्यांना सोडवत नाही आणि त्यांनी एनडीएमध्ये अभिमानाचे दोन आय अक्षर टाकली आहेत. पहिला आय 26 पक्षांचा अभिमान आणि दुसरा आय एका कुटुंबाचा अभिमान. त्यांनी एनडीएची चोरी केली आणि भारताचेही तुकडे करत आहेत, असे विधान मोदींनी केले होते.
निवडणूक चिन्हही चोरल्यानंतरही पक्षाची शान दिसून आली नाही
विरोधकांचं नामप्रेम आजचं नाही, अनेक दशकांपासूनचं आहे. त्यांना वाटतं नाव बदलून देशावर राज्य करता येईल. त्याचं नाव सर्व ठिकाणी आहे, पण त्याचं काम कुठेच दिसत नाही. रस्ते-उद्याने, गरीब कल्याण योजना, क्रीडा पुरस्कारांवर त्यांचे नाव आहे. त्यांनी स्वत:च्या नावाने योजना चालवल्या आणि त्या योजनांमध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला. आपल्या उणिवा झाकण्यासाठी त्यांनी निवडणूक चिन्हही चोरले, पण तरीही पक्षाची शान दिसून येत नाही, असे मोदी म्हणाले.