Video : काँग्रेस पक्ष सोडून डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (DPAP) स्थापन करणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी सर्व मुस्लीम पूर्वी हिंदू होते, असे मोठे वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या वक्तव्याला बजरंग दल आणि विहिंपचा पाठिंबा मिळाला आहे. आझाद यांचे हे विधान योग्य असल्याचे सांगून दोघांनीही याचा उल्लेख आपण आधीच केला असल्याचे सांगितले आहे. आझादचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्यावरून येत्या काळात राजकारण तापण्याची शक्यता आहे. (Video All Muslims were Hindus before after conversion Azads statement supported by Bajrang Dal and VHP)
गुलाम नबी आझाद यांचा हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील आहे. गुलाम नबी आझाद यांनी 9 ऑगस्ट रोजी डोडाच्या चिरल्ला गावातील एका सरकारी शाळेतील मेळाव्याला संबोधित करताना म्हटले होते की, हिंदू धर्म इस्लामपेक्षा जुना आहे. सर्व मुस्लीम पूर्वी हिंदू होते. आपल्या देशात मुसलमान हिंदूंमधून धर्मांतरानंतर आले आहेत. काश्मीरमधील सर्व मुस्लीम काश्मिरी पंडितांपासून धर्मांतरित आहेत. प्रत्येकाचा जन्म आधी हिंदू धर्मात झाला आहे, असे वक्तव्य गुलाम नबी आझाद यांनी केले आहे.
Ghulam Nabi Azad का बयान – “600 साल पहले कश्मीर में मुसलमान नहीं थे, हिंदुओं का धर्म बदलकर मुसलमान बनाए गए थे” ! pic.twitter.com/uOtkTBWxsg
— Syed Amber Zaidi 🇮🇳 (@Amberological) August 17, 2023
600 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये मुस्लिम नव्हते
गुलाम नबी आझाद म्हणाले की, इस्लाम भारतात 1500 वर्षांपूर्वी अस्तित्वात आला मात्र, हिंदू धर्म इस्लामपेक्षा फार जुना आहे. मुघल सैन्याचे 10-20 मुस्लिम सैनिक जे भारतात आले असतील. अन्यथा संपूर्ण भारत हिंदू आहे आणि त्याचे उदाहरण काश्मीरमध्ये आहे. 600 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये मुस्लीम नव्हते आणि सर्व काश्मिरी पंडित होते.
हेही वाचा – निर्दोषमुक्त ठरवलेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी माजी खासदारास सर्वोच्च न्यायालयाचा झटका; वाचा सविस्तर…
प्रत्येकाचा जन्म हिंदू धर्मात झाला
गुलाम नबी आझाद म्हणाले की, सर्वांचा जन्म हिंदू धर्मात झाला आहे. काश्मिरी पंडितांनी इस्लाम स्वीकारला आहे, म्हणूनच मी म्हणालो की, सर्व लोक हिंदू धर्मात जन्माला आले आहेत. आमचे हिंदू बांधव मेले की जाळतात. नंतर हे अवशेष नदीत टाकले जातात, जे जलकुंभात जातात. ते पाणी सिंचनासाठीही वापरले जाते आणि तेच पाणी आपण पिकांसाठी वापरतो. मुस्लीम धर्मांत मृतदेह जमीनीत पुरतात म्हणजे तेही मातीत मिसळतात. हिंदू आणि मुस्लीम दोघेही शेवटी मातीत मिसळतात. हे सर्व राजकारण आहे. राजकारणात धर्माचा अवलंब करणारे दुर्बल असतात.
आमच्या पक्षात धर्माला स्थान नाही
देशात धर्माच्या नावावर मते मागितली जातात, यावर बोलताना गुलाम नबी आझाद म्हणाले की, धर्माचा राजकारणाशी काही संबंध नाही. त्यामुळे धर्माच्या नावावर लोकांची मते घेऊ नका. धर्माच्या नावावर कोणी मते घेतली तर देशाच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो आणि द्वेष पसरतो. त्यामुळे आमच्या पक्षात धर्माला स्थान नाही. आपल्या राज्याच्या विकासासाठी आपण एकत्र यावे, असे आवाहन आझाद यांनी उपस्थित जनतेला केले.
हेही वाचा – ‘या’ महिला देखील कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल करू शकतात, केरळ हायकोर्टाचा निर्णय
आझाद यांचे विधान हिंदू संघटनांच्या भूमिकेशी सुसंगत
बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक नीरज दौनेरिया म्हणाले की, आझाद यांचे विधान हिंदू संघटनांच्या भूमिकेशी सुसंगत आहे. गुलाम नबी आझाद यांचे विधान बरोबर आहे. कारण बजरंग दल देखील अनेक दिवसांपासून देशातील मुस्लीम आणि ख्रिश्चनांनी हिंदू धर्मातून धर्मांतरित झाल्याचे सांगत आहे.
गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्याचे विहिंपकडून स्वागत
विहिंप केंद्रीय संघटनेचे सरचिटणीस विनायकराव देशपांडे म्हणाले की, मी गुलाम नबी आझाद यांच्या विधानाचे स्वागत करतो. त्यांनी म्हटले होते की, हिंदू धर्म इस्लामपेक्षा जुना आहे आणि काश्मिरी मुस्लीम हे हिंदू होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते कविंदर गुप्ता यांनीही आझाद यांच्या विधानाशी सहमती दर्शवली. ते म्हणाले की, इतर धर्मांचे लोक देशात येण्यापर्वी लोकांनी हिंदू धर्माचे पालन केले होते.