हत्तींच्या झेड सिक्युरिटीमध्ये पिटुकल्या पिलाची रोड परेड, व्हिडीओ व्हायरल

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ कुठल्याही व्यक्तीचा नसून चक्क एका इटुकल्या पिटुकल्या हत्तीच्या पिल्लाचा आहे

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही आणि त्यातून मिळणाऱ्या प्रसि्दधीमुळे कोणाचे नशीब कधी फळफळेल हे देखील सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ कुठल्याही व्यक्तीचा नसून चक्क एका इटुकल्या पिटुकल्या हत्तीच्या पिल्लाचा आहे. जो महाकाय हत्तींच्या कळपाबरोबर रमत गमत रस्त्यावर चालतोय.

या व्हिडीओवर नेटीझन्सच्या प्रतिक्रियांचा अक्षरश पाऊस पडला आहे. भारतीय वनविभागाचे अधिकारी सुशांत नंदा (Susanta Nanda) यांनी त्यांच्या टि्वटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याखाली त्यांनी एक कॅप्शन दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की एका छोट्या नवजात गोड पिलाला या पृथ्वीवर हत्तीच्या कळपाहून अधिक सुरक्षा कोणीच नाही देऊ शकणार.  कोईम्बतूरमधील सत्यमंगलम    यावर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रियांचा पाऊस पाडला असून या व्हिडीओला २५ हजाराहूनही अधिक व्हयूज मिळाले आहेत. एकाने ही तर झेड सिक्युरिटी असल्याची मजेशीर कमेंट्स केली आहे . जी या व्हिडीओसाठी अगदी योग्य असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.