Video – जंगलात वाघिणीबरोबर ५ वाघांचा वॉक, पर्यटकांना फुटला घाम, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर अनेकवेळा हिंस्त्र प्राण्यांचे त्यांच्या वन्यजीवनाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही गंमतीदार तर काही अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जंगलातील हा व्हिडीओ असून यात एका वाघिणीबरोबर एक दोन नाही तर चक्क पाच वाघ डौलात चालत असल्याचे दिसतय. अचानक समोर आलेला वाघांचा हा कळप बघून जंगलसफारीचा आनंद घेण्यासाठी जंगलात गेलेल्या पर्यटकांना मात्र घाम फुटला.

पर्यटक ज्या टुरिस्ट गाडीमध्ये बसले आहेत ती मागे जाताना व्हिडीओत दिसत आहे. तर समोरून वाघांचा कळप मात्र मोठ्या दिमाखत येत आहे. त्यांना बघून जीवाच्या भीतिनेच गाडीचालक गाडी रिवर्स घेताना दिसत आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी टि्वटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला पाच पांडवाबरोबर कुंती. पश्चिम भारतामधून ५ सुदृढ शावकांना बघणे हा दुर्लभ योग असल्याचेही नंदा यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. त्यावर यूर्झसही मजेशीर कमेंट्स करत आहे.