Video: भारतीय सैन्याने केली नवजात बाळ आणि आईची मदत

काश्मिरमध्ये राहणाऱ्या महिलेची सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रसुती झाली होती.

Video: Indian Army helps newborn baby and mother
Video: भारतीय सैन्याने केली नवजात बाळ आणि आईची मदत

काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने एका काश्मिरी महिलेला आणि तिच्या नवजात बालकाला सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी मदत केली आहे. कोणत्याही स्वार्थाशिवाय भारतीय सैनिक नेहमीच नागरिकांची मदत करत असतात. यावेळीही भारतीय सैन्याने जम्मू काश्मीरममध्ये एका काश्मिरी महिलेला आणि तिच्याा नवजात बालकाला सुखरूपणे त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी मदत केली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. यात भारतीय सैनिक महिलेला स्ट्रेचरवर ठेवून बर्फातून घेऊन जाताना दिसत आहेत.

काश्मिरमध्ये राहणाऱ्या महिलेची सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रसुती झाली होती. प्रसुतीनंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज घेऊन आपल्या नवजात बाळासह महिला घरी जात होती. दरम्यान काश्मीरच्या वातावरणात सातत्याने बदल होत होता. रस्त्यावर बर्फ साचल्याने तिथून एकही वाहन जात नव्हते. रस्त्यावरून जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. अशा परिस्थितीत महिलेला तिच्या नवजात बाळाला घेऊन चालणे शक्य नव्हते.

अशा परिस्थितीत भारतीय सैनिकांनी देवदूताप्रमाणे येऊन महिलेची मदत केली. राष्ट्रीय रायफल्सच्या सैनिकांनी पुढे येऊन महिलेची मदत केली. सैनिकांनी महिलेला स्ट्रेचरवर घेऊन तिला आणि तिच्या नवजात बाळाला सुखरूपणे घरी पोहचवले. भारतीय सैन्याने संकटाच्या काळात महिलेला आणि तिच्या बाळाला केलेल्या मदतीमुळे भारतीय सैन्याचे महिलेने आणि तिच्या कुटुंबियांनी आभार मानले. भारतीय सैन्याचे सगळीकडे कौतुक केले जात आहे.


हेही वाचा – भारतीय नौदलाचं ‘मिग-२९ के’ विमान अरबी समुद्रात कोसळलं, एक पायलट बेपत्ता!