VIDEO : असानी चक्रीवादळाच्या थैमानात समुद्रातून आला सोन्याचा रथ, पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी

VIDEO mysterious gold coloured chariot found in Andhra Pradesh ashore
VIDEO : असानी चक्रीवादळाच्या थैमानात समुद्रातून आला सोन्याचा रथ, पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी

देशातील पूर्व किनारपट्टीवर असानी चक्री वादळाचं संकट घोंघावत आहे. पश्चिम बंगालसह आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या समुद्र किनारपट्टीवर हे चक्री वादळ धडकणार आहे. वादळामुळे देशातील हवामानावरसुद्धा परिणाम झाला आहे. पूर्व किनारपट्टीवर जोरदार वारे वाहू लागले आहे. समुद्र खवळला असल्याचे पाहायला मिळत आहे. खवळलेल्या समुद्रातून एक सोन्याचा रथ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आला आहे. समुद्राच्या लाटांच्या थैमानातून हा सोन्याचा रथ बाहेर आल्याने चर्चांना उधाणं आलं आहे. तसेच रथ पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे.

चक्रीवादळाच्या थैमानातून हा रथ आंध्र प्रदेशच्या समुद्र किनारी कुठून आला असा प्रश्न निर्माण झाला आहे. आध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली किनाऱ्यावर सोन्याचा रथ आला आहे. रथाची बनावट पाहता परदेशातून म्हणजेच म्यानमार, मलेशिया किंवा थायलंडमधून वाहून आला असल्याचे गुप्तचर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान रथ नेमका कोठून आला याचा तपास सुरु करण्यात आला आहे. या रथाला सोन्याचा मुलामा देण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

सोशल मीडियावर या रथाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खवळलेल्या समुद्रातून हा रथ वाहून किनाऱ्यावर येत असल्याचे दिसत आहे. स्थानिक नागरिक, मच्छिमारांनी या रथाला दोरी बांधून समुद्र किनारी ओढून आणला आहे.

असानी चक्रीवादळाचा धोका वाढला

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ सध्या अंदमान निकोबार बेटांपासून २७० किलोमीटर, पोर्टब्लेअरपासून ४५० कि.मी., तर आंध्रप्रदेश व पुरीपासून ६१० कि.मी. अंतरावर खोल समुद्रात आहे. बुधवार ११ मेनंतर या चक्रीवादळाचा वेग कमी होऊन तो ६० ते ७० प्रति तास एवढा होईल. गुरूवारी १२ मेनंतर या चक्रीवादळाचे रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. या चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा : केरळमधील लहानमुलांमध्ये आढळली ‘टोमॅटो फ्लू’ची लक्षणं