घरताज्या घडामोडीशालेय बसच्या दरवाजात अडकली विद्यार्थिनी; चालकाने 1KM पर्यंत नेले फरफटत

शालेय बसच्या दरवाजात अडकली विद्यार्थिनी; चालकाने 1KM पर्यंत नेले फरफटत

Subscribe

अनेकदा गाडी चालवताना निष्काळजीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. शिवाय चालकच्या एका चुकीमुळे इतर चाकरमान्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. अशा घटनांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

अनेकदा गाडी चालवताना निष्काळजीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. शिवाय चालकच्या एका चुकीमुळे इतर चाकरमान्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. अशा घटनांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल माडियावर व्हायरल झाला असून, यामध्ये चालकाच्या चुकीमुळे मुलीचा जीव धोक्यात आल्याचे दिसत आहे. (video of school bus driver dragged the little girl to around 1km viral on social media school bus viral video)

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ 2015 सालचा आहे. हा व्हिडीओ अमेरिकेच्या केंटकी येथील आहे. यामध्ये बस थांब्यावर आल्यानंतर मुलगी खाली उतरत असते. त्यावेळी ही मुलगी शालेय बसच्या दाराजवळ आली असता, तिची बॅग दरवाजामध्ये अडकते. याशिवाय तिची बॅग अडकल्याचे चालक महिलेच्याही लक्षात येत नाही. त्यानंतर ही चालक महिला बस चालू करते आणि तशाच अवस्थेत मुलीला जवळपास 1000 फूट पेक्षा जास्त लांब फरफटत नेते.

- Advertisement -

ही धक्कादायक घटना बसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. काही वेळानंतर अचानक चालक महिलेची नजर गेटवर जाते. त्यावेळी तिला मुलगी गेटवर अडकल्याचे दिसते. त्यानंतर तिने ताबडतोब बस थांबवली आणि मुलीला वाचवले.

ही घटना 2015 असून आता या घटनेचा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘डीन ब्लंडेल’ नावाच्या अकाऊंटवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 6.2 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटाला दिलासा : शिवसेना कोणाची? निर्णयाचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -