घर देश-विदेश Video : कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थकांना उघड समर्थन, इंदिरा गांधींच्या हत्येचा देखावा सादर

Video : कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थकांना उघड समर्थन, इंदिरा गांधींच्या हत्येचा देखावा सादर

Subscribe

नवी दिल्ली : भारतविरोधी खलिस्तानी समर्थकांना कॅनडामध्ये उघडपणे पाठिंबा मिळताना दिसत आहे. कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा देखावा सादर करण्यात आला. या देखाव्यात दोन शीख बंदूकधारी त्यांच्यावर गोळीबार करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये खलिस्तानी समर्थकांनी इंदिरा गांधींबद्दल जो देखावा उघड्या ट्रकमध्ये सादर करण्यात आला. या देखाव्यात इंदिरा गांधींचा पुतळा सफेद साडीमध्ये दिसत असून यावर रक्त दिसत आहे. त्यांचे दोन्ही हात वरच्या बाजूला आहेत आणि समोर शीख जवानांचा पुतळा आहे. त्यांच्या हातात बंदुका दिसत आहेत. यासोबत या व्हिडीओमध्ये ऑपरेशन ब्लू स्टार आणि 84 च्या दंगलीचे बॅनर देखील दिसत आहेत.

- Advertisement -

ऑपरेशन ब्लू स्टारच्या 39 व्या वर्धापन दिनापूर्वी 4 जून रोजी खलिस्तानी समर्थकांनी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे समजते. सुमारे 5 किलोमीटर लांबीच्या मिरवणुकीत खलिस्तानी समर्थकांनी हा देखावा सादर केल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. लोकांनी या देखाव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. कॅनडामध्येही या देखाव्याविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. सोशल मीडियावर देखाव्याचे व्हिडीओ पोस्ट करून, लोक कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यावर टीका करताना दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

- Advertisement -

इंदिरा गांधीच्या देखाव्याप्रकरणी काँग्रेस नेत्याने दिली प्रतिक्रिया 
व्हिडीओ शेअर करताना काँग्रेस नेते मिलिंद देवरा म्हणाले, “एक भारतीय म्हणून, इंदिरा गांधींच्या हत्येचे चित्रण करणारी कॅनडातील ब्रॅम्प्टन शहरात 5 किमी लांबीची परेड पाहून मला धक्का बसला आहे. कोणाचीही बाजू घेण्याचा विषय नाही. एखाद्या देशाबद्दलचा आदर आणि त्याच्या पंतप्रधानाच्या हत्येच्या वेदनांबद्दल हा देखावा आहे. या देखाव्याविरोधात आपण एकजुटीने प्रतिक्रिया दिली पाहिजे. हे पूर्णपणे निषेधार्ह आहे.

ऑपरेशन ब्लू स्टार काय होते?
ऑपरेशन ब्लू स्टार हे पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराने केलेले ऑपरेशन होते. या ऑपरेशनमध्ये 3 ते 6 जून 1984 दरम्यान गोल्डन टेंपल कॉम्प्लेक्सच्या वेढादरम्यान जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शीख अतिरेकी लष्कराने मारले होते. यानंतर चार महिन्यांनी म्हणजे 31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या दोन शीख जवानांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

- Advertisment -