मोरासोबत पंतप्रधान मोदींनी शेअर केला व्हिडिओ

PM Modi with Peacock
PM Modi with Peacock

कोरोनाचा संसर्ग, चीनची घुसखोरी, नैसर्गिक आपत्ती यामुळे सातत्याने कार्यरत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मिळालेला फावला वेळ कसा घालवतात, आपल्याला ताजेतवाने कसे करतात, असे प्रश्न सर्वसामान्यांना सतावत असतात. त्याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच दिले आहे. त्यासंदर्भातील एक व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर रविवारी शेअर केला आहे. या व्हिडिओत ते मोरासोबत आपला वेळ घालवताना दिसत आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या निवासस्थानी ग्रामीण ढंगात एक जागा तयार केली आहे. येथे एक चबुतरा तयार करण्यात आला आहे. तेथे पक्षी आपले घरटे बनवू शकतात हे व्हिडिओत दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांचे पक्षीप्रेम आणि त्यांची निसर्गाची ओढ अनेकदा त्यांच्या संबोधनांद्वारे स्पष्ट झालेली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते डिस्कव्हरी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मध्ये बेअर ग्रिल्ससोबत दिसले होते.

लॉकडाऊनच्या काळात आपण वेळ कसा घालवला हे दाखवणारा एक व्हिडिओ आपण लवकरच शेअर करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले होते. यापूर्वी देखील पंतप्रधान मोदी मोरासोबत आपला वेळ घालवताना दिसलेले आहेत. जेव्हा मोदी आपल्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी व्यायाम करतात, तेव्हा आसपास मोर फिरत असताना नेहमीच दिसतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या व्हिडिओसोबत एक कविता देखील पोस्ट केली आहे.

मोदींची कविता
“भोर भयो, बिन शोर,
मन मोर, भयो विभोर,
रग-रग है रंगा, नीला भूरा श्याम सुहाना,
मनमोहक, मोर निराला।

रंग है, पर राग नहीं,
विराग का विश्वास यही,
न चाह, न वाह, न आह,
गूँजे घर-घर आज भी गान,
जिये तो मुरली के साथ
जाये तो मुरलीधर के ताज।

जीवात्मा ही शिवात्मा,
अंतर्मन की अनंत धारा
मन मंदिर में उजियारा सारा,
बिन वाद-विवाद, संवाद
बिन सुर-स्वर, संदेश
मोर चहकता मौन महकता।”

पंतप्रधान नरेंद्र मोदी जलवायू आणि वन संरक्षणावरदेखील बोलताना दिसतात. त्यांनी ‘Convenient Action: Gujarat’s Response to Challenges of Climate Change’ आणि ‘Convenient Action- Continuity for Change’ या नावाने दोन पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांद्वारे त्यांनी आपली दृष्टी पुढे ठेवली आहे. त्यांचे एक पुस्तक ‘आंख आ धन्य छे’मध्ये निसर्गावर कविता आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय सौर करारासाठी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.