Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी VIDEO : फ्रांसच्या राष्ट्रपतींवर अज्ञात व्यक्तीनं उचलला हात, २ जणांना अटक

VIDEO : फ्रांसच्या राष्ट्रपतींवर अज्ञात व्यक्तीनं उचलला हात, २ जणांना अटक

एका माणसाच्या दिशेने हस्तांदोलनासाठी आपला हात पुढे करताच युवकाने राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन यांच्या कानशिलात लगावली

Related Story

- Advertisement -

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन दक्षिण-पुर्व फ्रान्समधील ड्रोम भागातील दौऱ्यावर होते. यावेळी रस्त्याच्या किनारी असलेल्या गर्दीकडे राष्ट्रपती मॅक्रॉन गेले असता गर्दीतील एक व्यक्तीने त्यांच्या कानाखाली लगावल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाना वायरल होत आहे. तसेच याबाबतची माहिती बीएफएमटीव्ही आणि आरएमसी रेडिओने दिली असून व्हिडिओ देखील ट्विट केला आहे. एका युवकाने थेट राष्ट्रपतींच्या कानाखाली लगावली असल्यामुळे फ्रान्समध्ये खळबळ माजली आहे. सुरक्षारक्षकांनी तात्काळ राष्ट्रपतींना गर्दीच्या ठिकाणाहून हलवून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले तसेच चापट मारणाऱ्या व्यक्तीसह २ आणखी एका तरुणाला अटक करण्यात आले आहे.

कोरोना साथीनंतर रेस्टॉरंट आणि विद्यार्थ्यांच्या जनजीवनाबाबत आढावा घेण्यासाठी राष्ट्रपती इमॅन्यूअर मॅक्रॉन दक्षिण पुर्व फ्रान्समधील ड्रॉम भागाच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी चर्चा करण्यासाठी तसेच गर्दीतील नागरिकांना भेटण्यासाठी राष्ट्रपती रस्त्याच्या किनाऱ्यावर असेल्या गर्दीच्या ठिकाणी गेले होते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, राष्ट्रपती मॅक्रॉन रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गर्दीकडे जातात. त्या ठिकाणी गेल्यावर एका माणसाच्या दिशेने हस्तांदोलनासाठी आपला हात पुढे करतात परंतु गर्दीतील चष्मा आणि हिरव्या रंगाचा टी-शर्ट घातलेल्या एका व्यक्तीने राष्ट्रपतींच्या थेट कानशिलातच लगावली आहे.

- Advertisement -

राष्ट्रपतींवर हात उगारल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी दोन तरुणांना अटक केली आहे. सुरक्षा रक्षकांनी मारेकऱ्याला पकडून ठेवून राष्ट्रपतींना घटनास्थळावरुन सुरक्षित ठिकाणी नेले जाते. तसेच राष्ट्रपतींच्या सुरक्षा रक्षकाने मॅक्रॉन यांच्या कानशिलात लगावली असल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. तर फ्रान्सच्या पंतप्रधान ज्यां कास्टेक्स यांनी या घटनेला लोकशाहीचा अपमान म्हटले आहे.

मारेकऱ्याबाबात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न

- Advertisement -

राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यावर हात उगारणाऱ्या तरुणाबाबत अधिक तपास करण्यात येत आहे. तसेच या व्यक्तीने राष्ट्रपतींवर हात का उचलला याबाबतही अधिक माहिती मिळाली नाही आहे. मारेकऱ्याने हात उगारला तेव्हा ‘Montjoie Saint Denis’ असा शब्द उच्चारला होता. हा शब्द शत्रुवर हल्ला करताना राजेशाहीमध्ये वापरला जाणारा नारा आहे.

- Advertisement -