ईडीची चंदा कोचर यांच्यावर कारवाई; घरासह ७८ कोटींची संपत्ती जप्त

Videocon loan case: ED provisionally attaches Chanda Kochhar’s assets worth Rs 78 crore
चंदा कोचर

ईडीने म्हणजेच अंमलबजावणी संचलनायलाने आयसीआयसीआय बँकेच्या माजी प्रमुख चंदा कोचर यांच्या मुंबईतील घरासह त्यांच्या पतीचे ७८ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे चंदा कोचर यांच्या अजून अडचणी वाढल्या आहेत. चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी व्हिडिओकॉन कंपनीला पदाचा गैरवापर करत ३२५० कोटींचं कर्ज दिलं होत. हे कर्ज देताना कोचर यांनी व्यक्तिगत हित बघितलं आणि त्याचा फायदा घेतला असा त्यांच्यावर आरोप आहे.

उद्योगपती धूत आणि चंदा कोचर यांचे पती दिपक कोचर यांनी एकत्र येऊन न्यू पॉवर रिन्यूवेबल ही कंपनी स्थापन केली होती. त्या कंपनीच्या नावावर ६४ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आलं होत. त्याशिवाय व्हिडिओकॉन ग्रुपच्या पाच कंपन्यांच्या नावावर तीन हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आलं होत. त्यातील ८६ टक्के रक्कम म्हणजेच दोन हजार ८१० कोटी रुपये देण्यात आलेले नाही. त्यानंतर २०१७ मध्ये या कर्जाला बुडीत घोषित करण्यात आलं होत. आता या सगळ्या प्रकरणी चंदा कोचर यांच्या घरासह एकून ७८ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.


हेही वाचा – CAA कायद्याला पाठिंबा देण्यासाठी शिक्षकांची शालेय विद्यार्थ्यांना धमकी!