घरदेश-विदेशVidhana Soudha : शुद्धीकरणाचे लोण आता कर्नाटकमध्ये, विधानभवनात शिंपडले गोमूत्र

Vidhana Soudha : शुद्धीकरणाचे लोण आता कर्नाटकमध्ये, विधानभवनात शिंपडले गोमूत्र

Subscribe

बंगळुरू : महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे हिंदू महासभेकडून अलीकडेच शुद्धीकरण करण्यात आले. याचे लोण आता कर्नाटकात पोहोचले असून सर्वधर्मसमभावचा पुरस्कार करणाऱ्या काँग्रेसने कर्नाटक विधानसभेचे (Vidhana Soudha) शुद्धीकरण केले. आधीच्या भाजपा सरकारने भ्रष्टाचाराने ही विधानसभा दूषित केली आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

महाराष्ट्राच्या नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांनी बळजबरीने मंदिराच्या आतमध्ये घुसण्याचा कथित प्रयत्न केल्याचे समोर आले. याबद्दल बाह्मण महासंघाने पोलिसांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती. राज्य शासनाकडून देखील या घटनेची दखल घेण्यात आली आणि एसआयटी चौकशी जाहीर करण्यात आली. तर, हिंदू महासभेकडून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महाद्वारावर गोमूत्र (cow urine) शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले.

- Advertisement -

आता काँग्रेसने सोमवारी कर्नाटक विधानसभेचे शुद्धीकरण केले. पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा भवनात गंगाजल आणि गोमूत्र शिंपडले तसेच हवन-पूजनानंतर हनुमान चालिसाचे पठण केले. भाजपाने आपल्या भ्रष्टाचाराने विधानसभा अशुद्ध केल्याचे काँग्रेसने सांगितले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (Deputy CM DK Shivakumar) यांनी यावर्षी जानेवारीतच, विधानसभेचे गोमूत्राने शुद्धीकरण करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले होते.

- Advertisement -

सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर 16व्या कर्नाटक विधानसभेचे पहिले अधिवेशन सोमवारी सर्व नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी सुरू झाले. त्याआधी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बंगळुरूमध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते एस. एम. कृष्णा (S. M. Krishna) यांचे पाया पडून आशीर्वाद घेतले. त्यानंतर विधानसभेत प्रवेश करण्यापूर्वी विधानसभेच्या पायऱ्यांवर शिवकुमार नतमस्तक झाले. त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते बसवराज बोम्मई यांचीही भेट घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -