घरदेश-विदेशVijay Mallya Bankrupt: विजय माल्ल्या इंग्लंडच्या कोर्टाकडून दिवाळखोर घोषित

Vijay Mallya Bankrupt: विजय माल्ल्या इंग्लंडच्या कोर्टाकडून दिवाळखोर घोषित

Subscribe

बँकांची हजारो कोटींची फसवणूक करत फरार झालेला भारतीय उद्योगपती विजय माल्ल्याला इंग्लंड हायकोर्टाने दिवाळखोर घोषित केले आहे. या निर्णयामुळे भारतीय बँकांना आता माल्ल्याची संपती जप्त करुन कर्जाची थकवलेली रक्कम वसूल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय बँकांची बाजू मांडणाऱ्या संघटनेने माल्ल्याविरोधात इंग्लंड कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत विजय माल्ल्याच्या किंगफिशर कंपनीना देण्यात आलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी माल्ल्याला दिवाळखोर घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती.

या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी विजय माल्ल्याचे वकील फिलीप मार्शल यांनी केली. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे, ही मागणी फेटाळून लावत न्यायालयाने म्हटले की, माल्ल्या यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे योग्य असे पुरावे नाहीत. जेणेकरुन याचिकाकर्त्यांना त्यांचे पैसे योग्य वेळेत परत केले जातील. मात्र इंग्लंड हायकोर्टाच्या दिवाळखोरी आदेशाविरोधात दाद मागण्यासाठी माल्ल्याच्या वकीलाने एक निवेदनही न्यायालयाला सादर केले. मात्र, ‘ या अपीलामध्ये कोणतीही वास्तवाता नाही ‘असे सांगत न्यायमूर्ती ब्रिग्ज यांनी हे निवेदनही फेटाळून लावले.

- Advertisement -

यावर विजय माल्ल्याचं असे म्हणणे आहे की, त्याने भारतीय बँकांचे थकललं कर्ज हे सार्वजनिक पैसे आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत बँक दिवाळखोरी जाहीर करू शकत नाही. असं म्हणत माल्ल्याने असा दावा केला की, भारतीय बँकांनी दाखल केलेली दिवाळखोरीची याचिका कायद्याच्या चौकटीत न बसणारी आहे. तसेच भारतातील त्याच्या मालमत्तेच्या सुरक्षेवर हात घातला जाऊ शकत नाही कारण ते जनतेच्या हिताच्या विरुद्ध आहे. विजय माल्ल्यावर त्यांच्या दिवाळखोर किंगफिशर एअरलाईन्सशी संबंधित ९००० कोटी रुपयांचे बँक कर्ज जाणीवपूर्वक न भरल्याचा आरोप आहे.


Assam-Mizoram Border Violence: महाराष्ट्राचे सुपूत्र SP वैभव निंबाळकर गंभीर जखमी, सुप्रिया सुळेंनी त्यांच्या आरोग्यासाठी केली प्रार्थना


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -