घरदेश-विदेशविजय मल्ल्याला न्यायालयाचा अभय

विजय मल्ल्याला न्यायालयाचा अभय

Subscribe

ब्रिटिश कोर्टने मल्ल्याचा जामीन केला मंजूर, 'माझ्यावरील सर्व आरोप खोटे' - मल्ल्या

मद्यसम्राट विजय मल्ल्या विरोधातील प्रत्यार्पण खटल्यात ब्रिटिश कोर्टाने आज जामीन मंजूर केला आहे. ब्रिटिश कोर्टाने मल्ल्याची जामीन मंजूर करुन १२ सप्टेंबरपर्यंत पुढील सुनावणी ढकलली आहे. कोर्टाने भारतीय अधिकाऱ्यांना मल्ल्याला  ठेवण्यात येणाऱ्या तुरुंगाचा व्हिडिओ कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाबाहेर पडून मल्ल्याने पत्रकाराशी संवाद साधताना म्हटलं की, “माझ्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप नसून माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत.” ६२ वर्षीय मल्ल्या १७ भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झाला होता.

यापूर्वी २७ एप्रिल ला वेस्टमिन्स्टर न्यायालयात मल्ल्याविरोधात सीबीआयव्दारे पुरावे सादर करण्यात आले होते. ब्रिटनच्या न्यायालयात काही दिवसांपूर्वी मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्याचीही परवानगी दिली होती. ब्रिटेनमध्ये मल्ल्याच्या मालकीच्या काही गाड्या आणि दागिने आहेत. देशातील १७ बँकांनी मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिले होते. ३१ जानेवारी २०१४ पर्यंत मल्ल्यावर ६ हजार ९६३ कोटी रुपयांचे कर्ज होते. २०१६ पर्यंत ही रक्कम ९ हजार कोटींपर्यंत पोहोचली. ही रक्कम व्याजासह १० हजार कोटीपर्यंत पोहोचली. यानंतर मल्ल्या परदेशात पळून गेला. बँकांनी आतापर्यंत ९६५ कोटी रुपयांची रिकव्हरी केली आहे.

- Advertisement -

मागील काही दिवासांत विजय मल्ल्या भारतात परत यायचे असल्याची चर्चा सुरु होती. भारतात सुरु असलेल्या खटल्याला सामोरे जाण्यासाठी मल्ल्या तयार असून बँकाचे कर्जही फेडण्यासाठी त्याची तयारी असल्याचे सांगितल्या जात होते. मल्ल्या भरतात परतल्यावर त्याला अटक केली जाणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -