घरताज्या घडामोडीमल्ल्याला ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टाचाही दणका, आता भारतात येण्यावाचून पर्याय नाही!

मल्ल्याला ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टाचाही दणका, आता भारतात येण्यावाचून पर्याय नाही!

Subscribe

उद्योगपती विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाविरोधातील याचिका लंडन हायकोर्टानंतर आता ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टानेही फेटाळली आहे. त्यामुळे आता मल्ल्याचे प्रत्यार्पणाचे सगळे मार्ग आता बंद झाले आहेत. त्यामुळे येत्या २८ दिवसात मल्ल्याला भारतात आणले जाऊ शकते. यासाठी भारतीय वंशाच्या प्रीती पटेल या ब्रिटनच्या गृह सचिव अंतिम निर्णय घेणार आहेत. यापूर्वीही ब्रिटनच्या तत्कालीन गृह सचिवांनी मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली होती. पण त्याने लंडन हायकोर्ट आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.

लंडनच्या हायकोर्टात दाखल केली होती याचिका

– विजय मल्ल्याने या आधी लंडनच्या हायकोर्टात याचिता दाखल केली होती. पम यावेळी भारतीय यंत्रणांनी स्वत:ची बाजू भक्कमपणे मांडत मल्ल्याचा धक्का दिला होता. त्यानंतर विजय मल्ल्याने अखेर सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. पण आता सुप्रीम कोर्टानेही याचिका फेटाळली आहे.

- Advertisement -

मल्ल्याची भारताला ऑफर

विजय मल्ल्याने भारताला एक ऑफर दिली आहे. मल्ल्याने भारत सरकारला आपण शंभर टक्के कर्ज फेडण्यास तयार आहोत,  माझ्यावर सुरू असलेले खटले मागे घ्या, अशी ऑफर दिली. त्याचबरोबर मल्ल्याने भारताच्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजबद्दल सरकारचं अभिनंदनही केलं.

विजय मल्ल्या म्हणतो…

कोरोना विरूद्धच्या लढ्यासाठी मोदी सरकारने मोठी पॅकेडची घोषणा केली, त्याचे मी स्वागत करतो. सरकार हवा तेवढा पैसा छापू शकतं.  पण मी सरकारी बँकांचं शंभर टक्के कर्ज द्यायला तयार आहे. पण याकडे वारंवार का दुर्लक्ष केलं जातंय? असा प्रश्नही मल्ल्याने विचारला.

- Advertisement -

हे खटले मल्ल्यावर

विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्सने सरकारी बँकांचं हजारो कोटींचं कर्ज घेतलं आहे,  जे परत केलं नाही. त्यामुळे त्याच्यावर पैशांची अफरातफर आणि फसवणूक असे खटले चालू आहेत. त्याच्याकडून नऊ हजार कोटींची वसुली होणार आहे.


हे ही वाचा – ‘या’ पाच गोष्टींनंतर अजिबात आंघोळ करू नका, जीवावर बेतू शकतं!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -