घरताज्या घडामोडीमाल्ल्यानं पुन्हा गंडवलं; इतक्यात भारताकडे प्रत्यार्पण नाहीच!

माल्ल्यानं पुन्हा गंडवलं; इतक्यात भारताकडे प्रत्यार्पण नाहीच!

Subscribe

१४ मे रोजी विजय माल्ल्याने भारताकडे प्रत्यार्पणाविरोधात लंडनच्या कोर्टात केलेली शेवटची याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे पुढच्या २८ दिवसांमध्ये विजय माल्ल्याला भारताच्या हवाली करणं आवश्यक झालं आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री विजय माल्ल्याचं कुठल्याही क्षणी भारताकडे प्रत्यार्पण होऊ शकतं, असं जाहीर झाल्यामुळे सगळेच त्याच्या येण्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले. पण विजय माल्ल्या भारतात इतक्यात करी येणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माल्ल्याने भारताला आणि भारतीयांना गंडवल्याचं समोर आलं आहे.

माल्ल्या म्हणतो, ‘त्यांचं त्यांनाच माहीत’

विजय माल्ल्याचं कुठल्याही क्षणी भारताकडे प्रत्यार्पण होणार असल्याच्या वृत्तामध्ये कोणतंही तथ्य नाही. त्याचं प्रत्यार्पण करण्याची सर्व कार्यवाही पूर्ण झाल्याची कोणतीही माहिती आलेली नाही. खुद्द विजय माल्ल्याच्या असिस्टंटने सांगितल्याप्रमाणे तिला स्वत:ला माल्ल्याच्या भारतात येण्याबाबत काहीही माहिती नाही. त्याशिवाय खुद्द माल्ल्याने देखील या गोष्टीला नकार दिला आहे. प्रत्यार्पणाविषयीचं माध्यमांमध्ये आलेलं वृत्त खरं आहे का? असं विचारलं असता ‘ते काय म्हणत असतात ते फक्त त्यांनाच माहिती’, असं म्हणत माल्ल्यानं या वृत्ताला उडवून लावलं आहे.

- Advertisement -

यासंदर्भात लंडनमधल्या उच्चाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताचं पूर्णपणे खंडन केलं आहे. ‘६४ वर्षीय माल्ल्याचं बुधवारी रात्री किंवा नजीकच्या काही दिवसांमध्ये भारताकडे प्रत्यार्पण होण्याची काहीही शक्यता नाही. माध्यमांनी सीबीआयच्या एका जुन्या वक्तव्याचा आधार घेऊन हे वृत्त दिलं आहे. विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबतची परिस्थिती अजिबात बदललेली नाही. त्याला उशीर होणार आहे’, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. ‘विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाची कोणतीही तारीख अजून तरी ठरवण्यात आलेली नाही. जेव्हा केव्हा त्याचं प्रत्यार्पण होईल, तेव्हा मेट्रोपोलिटन पोलीसच हिथ्रो विमानतळावर माल्ल्या भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यासाठी जातील’, अशी माहिती लंडन मेट्रोपोलिटन पोलिसांच्या प्रवक्त्याने दिली आहे.

माल्ल्याला भारतात आणण्यावरून नेटिझन्स पेटले, एक सो एक मीम्स व्हायरल!

- Advertisement -

माल्ल्यावर अजूनही खटले प्रलंबित!

लंडन गृह सचिव प्रिती पटेल यांनी अजूनही विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या कागदपत्रांवर सही केलेली नसल्यामुळेच त्याचं प्रत्यार्पण लांबणीवर पडल्याचं सांगितलं जात आहे. लंडनच्या एका कोर्टामध्ये अजूनही विजय माल्ल्याविरोधात भारतीय बँकांना १५० कोटी युरो इतक्या रकमेवर फसवल्याची केस सुरू आहे. त्याशिवाय युनायटेड स्पिरीट्सच्या संचालकपदाचा त्याग केल्यानंतर त्याला मिळालेल्या सुमारे ३०० कोटींबाबत दियागियो कंपनीने त्याच्याविरोधात खटला दाखल केला आहे. या प्रकरणांची सुनावणी प्रलंबित असल्यामुळेच त्याचं प्रत्यार्पण लांबणीवर पडल्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -