घरदेश-विदेशविजय मल्ल्या, नीरव मोदीला भारताकडे सोपवणार; इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे मोठे...

विजय मल्ल्या, नीरव मोदीला भारताकडे सोपवणार; इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे मोठे विधान

Subscribe

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दोन्ही देशांतील संरक्षण, व्यापार आणि इतर मुद्यांवर चर्चा केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला.

नवी दिल्ली : दोन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आलेले इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारी भारतातून फरार झालेला कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाविषयी मोठे वक्तव्य केले. या दोघांनाही आम्ही भारताकडे सोपवण्यास तयार आहोत, असे बोरिस जॉन्सन म्हणाले. त्यामुळे भारतीय तपास यंत्रणांना मोठे बळ मिळाले आहे.

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दोन्ही देशांतील संरक्षण, व्यापार आणि इतर मुद्यांवर चर्चा केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी जॉन्सन म्हणाले की, तुम्ही ज्या दोन व्यक्तींविषयी बोलत आहात, त्यांना भारतात पाठवण्यास आम्ही तयार आहोत, परंतु काही कायद्याच्या अडचणी येत आहेत. कायदा मोडून येणार्‍यांचे आम्ही कधीही स्वागत केलेले नाही. सोबतच खलिस्तानी संघटनांचे उच्चाटन करण्यासाठी दहशतवादविरोधी टीम नेमल्याचेही जॉन्सन यांनी सांगितले.

- Advertisement -

एकदम तेंडुलकर, बच्चन झाल्यासारखे वाटले

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गुरुवारी अहमदाबादमधील साबरमती आश्रमाला भेट दिली. या भेटीत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. या भव्य स्वागताबद्दल जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष आभार मानले. पंतप्रधान मोदींचा खास उल्लेख करीत या भव्य स्वागतामुळे मला एकदम सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन झाल्यासारखे वाटले, अशी प्रतिक्रिया जॉन्सन यांनी दिली.

- Advertisement -


हेही वाचाः ट्रोल होऊनही बॉलीवूडस्टार्स का करतात पान मसाल्याच्या जाहीराती? हे आहे कारण

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -