घरदेश-विदेशविजय मल्ल्याचे 'Happy Holi' चे ट्विट व्हायरल; 'आधी पैसे परत कर' युजर्सच्या...

विजय मल्ल्याचे ‘Happy Holi’ चे ट्विट व्हायरल; ‘आधी पैसे परत कर’ युजर्सच्या कमेंट्स

Subscribe

देशासह जगभरात होळी सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेकांकडून होळीनिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. यात भारतातून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने देखील ट्विट करून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु या शुभेच्छांमुळे त्याला खूप ट्रोल केलं जात आहे. विजय मल्ल्याने ट्विटरवर ‘हॅप्पी होली’ असं ट्विट केलं आहे. मात्र या ट्विटवर आता युजर्सकडून ‘बँक फसवणुकीचे पैसे परत कर’ अशा कमेंट्स केल्या जात आहे. विजय मल्ल्याविरोधात भारतात 9000 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. मात्र घोटाळा उघडकीस आल्यानंतर मल्ल्या भारतातून लंडनला पळून गेला.

- Advertisement -

विजय मल्ल्याने गुरुवारी रात्री एक ट्विट करत लिहिले की- “सर्वांना होळीच्या शुभेच्छा”. त्यानंतर लगेचच ट्विटर युजर्सनी मल्ल्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. कुणी लिहिलं की, आधी पैसे परत कर, तर कुणी म्हटलं की, रंग लावूनच भारतात परत ये. युजर्सनी कमेंट बॉक्समध्ये मल्ल्यावर अनेक मजेदार मीम्सही शेअर करत आहेत.

- Advertisement -

नुकतेच केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या मालमत्तांमधून बँकांनी 18000 कोटी रुपये वसूल केले आहेत. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, अंमलबजावणी संचालनालय ईडीने पीएमएलए अंतर्गत न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार बँक डिफॉल्ट प्रकरणात ही रक्कम जप्त केली. या फरार व्यावसायिकांकडून घोटाळ्याची संपूर्ण रक्कम लवकरात लवकर वसूल करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.


Holi 2022 : केस, चेहरा आणि नखांवरील रंग निघत नसल्यास ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -