Homeदेश-विदेशVijay Mallya : फरार विजय माल्याने दिल्या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा अन् मिम्सचा पाऊस

Vijay Mallya : फरार विजय माल्याने दिल्या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा अन् मिम्सचा पाऊस

Subscribe

नवी दिल्ली : गेली अनेक वर्ष प्रसिद्ध उद्योगपती विजया मल्ल्या हा फरार असूनही अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. भारतीय बँकांचे पैसे बुडवून परदेशात पळून गेलेला विजय माल्या सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टीव्ह असतो. नुकतेच दिल्लीतील न्यायालयाने त्याला परकीय चलन नियमन कायद्याचे (FERA) उल्लंघन प्रकरणात समन्स चुकवल्याबद्दल फरार गुन्हेगार घोषित केले होते. एकीकडे सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे त्याने अनेकदा सोशल मीडियावरून देशात घडलेल्या घटनांवर पोस्ट केल्या आहेत. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले होते तेव्हा त्याने पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. तर, मंगळवारी (14 जानेवारी) मकर संक्रांतीदिवशीदेखील त्याने सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. (Vijay Mallya wishes on makar sankranti on twitter and reactions)

हेही वाचा : Sharad Pawar : मुंडेंचा राजीनामा घेण्यास अजितदादांचा नकार, शरद पवार म्हणाले, याचा निकाल… 

फरार उद्योगपती विजय माल्याने ट्विटरवर ‘मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा’ अशी पोस्ट केली होती.

यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. तसेच, यावेळी या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये मिम्सचा पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले.

एका युझरने लिहिले की, “दोन गोष्टी कायम राहतील, एक म्हणजे विराट कोहली बाहेरचा चेंडू खेळणार आणि सुट्टीदिवशी विजय माल्या ट्विट करणार,” असे म्हणत त्याने टोला लगावला.

“काका, संक्रांतीदिवशी भारताचे थोडे पैसे पाठवा” असे म्हणत एका युझरने खिल्ली उडवली आहे.

“सर, पुन्हा एकदा भारतात या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मालकी हक्क परत तुमच्याकडे घ्या. संपूर्ण आरसीबी निवड समिती बरखास्त करा,” अशी टिपण्णी एका युझरने केली.