Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी vijay rupani resigns : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा राजीनामा

vijay rupani resigns : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा राजीनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार

Related Story

- Advertisement -

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी गांधीनगर येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या भेटीनंतर राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्याचेही कारण त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आगामी २०२२ ची निवडणूक ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपमध्ये संघटनात्मक कोणतीही तक्रार नव्हती. मी आतापर्यंत एकत्र मिळूनच काम केले आहे. माझा पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झाला आहे. येत्या काळात पक्षाकडून नवीन जबाबदारी अपेक्षित आहे. त्याचवेळी गुजरात राज्याला नवा चेहरा आणि नेतृत्व मिळेल असे रूपाणी यांनी स्पष्ट केले. (Vijay rupani resigns as gujarat Chief minister)

- Advertisement -

भाजपमध्ये एक विशिष्ट कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर जबाबदारी बदलते. ही स्वाभाविक अशी प्रतिक्रिया आहे. त्यामुळेच माझ्याकडे असलेली पाच वर्षांची जबाबदारी मी सांभाळली. आता पक्ष देईल ते काम मी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी २०२२ साठी मोदींच्या नेतृत्वातच निवडणूकांना सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजीनामा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार त्यांनी मानले.

- Advertisement -

पक्षाअंतर्गत कोणतेही खटके उडाले नव्हते. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसारच मी काम करत होतो असेही ते म्हणाले. पक्षाकडून मला यापुढच्या काळात जी जबाबदारी देण्यात येईल, ती जबाबदारी मी पार पाडेन असेही ते म्हणाले. आमचे नेतृत्व नरेंद्र मोदी हे आहेत, संपुर्ण देश पातळीवर त्यांच्याच नेतृत्वाअंतर्गत आम्ही निवडणूकांना सामोरे जात आहोत. गुजरात राज्यात येत्या काळात येऊ घातलेल्या निवडणूकांसाठीही आम्ही मोदींच्या मार्गदर्शनाखाली निवडणूकांना सामोरे जाणार आहोत असेही ते म्हणाले. त्यामुळे पक्षांअंतर्गत वाद असण्याच्या आणि खटके उडण्याच्या चर्चांना त्यांनी यावेळी पूर्णविराम दिला. पक्षाकडून वेळोवेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येते. त्यानुसारच गुजरातसाठीही नवीन चेहऱ्याला संधी मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोणाला मिळणार संधी ?

रूपाणी यांच्या राजीनाम्यानंतर आता एक नवा ट्विस्ट निर्माण होणार आहे. आगामी काळात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी विजय रूपाणी यांच्यानंतर नवा चेहरा येणार का ? की गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट निर्माण होणार की गुजरात विधानसभा निवडणूकांना सामोरे जाणार असा तिहेरी पेच गुजरातमध्ये रूपाणी यांच्या राजीनाम्यानंतर निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सद्यस्थितीला निवडणूकांना सामोरे जाण्याची गुजरातमध्ये कोणतीही हालचाल दिसून येत नाहीए. त्याचवेळी पक्षाकडून नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. पण याबाबतचा कोणतीही निर्णय झालेला नाही. येत्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी राज्याला नवे नेतृत्व हवे आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री पदाची शपथ घेतलेले मनसुख मांडवीय यांच्याकडे ही जबाबदारी जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री असलेले नितीन पटेल किंवा पुरूषोत्तम रूपाला यांचीही नावे मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून समोर येत आहेत.


हेही वाचा – बलात्कार घटनेचं राजकारण करणं म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं; संजय राऊतांचा विरोधकांवर संताप


 

- Advertisement -