लॉरेन्स बिश्नोई गँगने प्रसिद्धीसाठी सलमान खानला दिली होती धमकी

बुधवारी दिल्लीत मुंबईच्या गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत हे पत्र विक्रम बराड याने दिल्याचं समोर आलं होतं. आता आणखी एक माहिती समोर आली असून विक्रम बराड हा लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमधील असल्याचं समोर आलं आहे.

पंजाबमधील गायक सिद्धू मूसेवाला (Siddhu Moosewala) याची हत्या झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला धमकीचं पत्र मिळालं होतं. त्याला धमकी आल्यामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. तेव्हापासून मुंबईच्या गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असून दिल्लीपर्यंत ही चौकशी करण्यात आली आहे. बुधवारी दिल्लीत मुंबईच्या गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत हे पत्र विक्रम बराड याने दिल्याचं समोर आलं होतं. आता आणखी एक माहिती समोर आली असून विक्रम बराड हा लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमधील असल्याचं समोर आलं आहे. तो बिश्नोईचा खास सहकारी असून त्याच्यावर तब्बल दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. (Vikram Barad, lawrence bishnoi gang gave threat to salman khan and salim khan for publicity)

सलमानला धमकी देण्यासाठी तीन लोक मुंबईत आले होते. सौरभ महाकालला हे तिघेजण भेटले. या महाकालची मुंबई गुन्हे शाखेने तब्बल सहा तास चौकशी केली. प्रसिद्धीसाठी ही धमकी दिल्याचं या चौकशीतून समोर आलं. या चौकशीदरम्यान महाकालने संपूर्ण माहिती दिल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा सलमान खान धमकी प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेची टीम दिल्लीला रवाना

विक्रम बराडनेच पाठवलं सलमानला पत्र

सलमानला धमकीचं पत्र पाठवणाऱ्यालाही पोलिसांनी ओळखलं आहे. विक्रमजीत सिंह बराड याने सलमानला हे पत्र पाठवलं आहे. विक्रम बराड हा राजस्थानचा कुख्यात गँगस्टर आनंदपाल याचा खास माणूस होता. मात्र, आनंदपालच्या एन्काऊंटरनंतर त्याने लॉरेन्स बिश्नोईसोबत तो जोडला गेला.

हेही वाचा – धमकी प्रकरणी सलमान खानने नोंदवला जबाब; मुंबई पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल

बराड हा राजस्थानमधील हनुमानगढ येथील रहिवासी असून सध्या तो देशाच्या बाहेर आहे. दोन दिवसाआधी या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनेही सलमानची चौकशी केली होती. या चौकशीत गोल्डी ब्रारला ओळखत नसल्याचं सलमानने सांगितलं. मी लॉरेन्स बिश्नोईला ओळखतो, गेल्या काही वर्षांपासून चाललेल्या प्रकरणावरूनच मी त्याला ओळखतो. इतर लोक जेवढं त्याला ओळखतात, तेवढंच मी ओळखतो असंही सलमानने सांगितलं.

सलमानला आलं होतं धमकीचं पत्र

सलमानला काही दिवसांपूर्वी एक धमकीचं पत्र आलं होतं. यामध्ये सलमान खान लवकरच तुझा सि्धू मूसेवाला होईल, असं लिहिलं होतं. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली होती. आयपीआय सेक्शन ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.