नवी दिल्ली : 61 वर्षांपूर्वी म्हणजेच 1962 मध्ये डॉ. विक्रम साराभाई यांच्या विनंतीवरून भारतात अंतराळ संशोधनासाठी राष्ट्रीय समितीची स्थापना करण्यात आली. यानंतर 1969 मध्ये राष्ट्रीय अवकाश संशोधन समितीचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत रूपांतर करण्यात आले. नासाप्रमाणेच इस्रोने सुद्धा अवकाश क्षेत्रात यशाच्या पायऱ्या चढाव्यात, असे स्वप्न विक्रम साराभाईंनी पाहिले होते. आज इस्रो त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी एकजुटीने काम करत आहे.
हेही वाचा – Chandrayaan-3: सुशांत सिंह ते टॉम क्रुज यांनी खरेदी केलीयं चंद्रावर जमीन
आजचा दिवस (ता. 23 ऑगस्ट) चांद्रयान-3 या मोहिमेसाठी खूप महत्त्वाचा आहे. लँडर विक्रम संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. याला काही तासच शिल्लक राहिलेले आहे. तर कदाचित त्याआधीच चांद्रयान-3 चंद्रावर लँडिंग करू शकते, असे ट्वीट काही वेळापूर्वी इस्रोकडून करण्यात आले आहे. या मोहिमेबाबत आता इस्रोचे संस्थापक विक्रम साराभाई यांचा मुलगा कार्तिकेय साराभाई यांनी आनंद व्यक्त केला आहे. (Vikram Sarabhai’s son expressed his happiness about Chandrayaan-3)
इस्रोचे संस्थापक विक्रम साराभाई यांचा मुलगा कार्तिकेय साराभाई याने एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “हा एक मोठा दिवस आहे. आम्ही ज्या अचूकतेने हे मिशन पार पाडले आहे ती एक अद्भुत गोष्ट आहे. चांद्रयान-3 मोहीम एका विशेष प्रक्रियेद्वारे पार पाडली जात आहे, जी आतापर्यंत कोणत्याही देशाने केलेली नाही, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
#WATCH | On Chandrayaan-3 mission, son of ISRO founder Vikram Sarabhai, Kartikeya Sarabhai says, “It is a big day. It is a fantastic thing for anyone on the planet not just India to be able to send this precision with which we have been able to send Chandrayaan-3 & also through a… pic.twitter.com/28mzJvSwUw
— ANI (@ANI) August 23, 2023
तसेच, “विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये आपण चुकांमधून शिकतो. आपल्या देशाचे लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार असून ही मानवतेसाठी मोठी गोष्ट असणार आहे, असे म्हणत कार्तिकेय साराभाई यांनी या मोहिमेबाबत आपला आनंद व्यक्त केला आहे. चांद्रयान-3 आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल. या मोहिमेच्या यशामुळे भारत हा चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगच्या तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवणारा अमेरिका, चीन आणि तत्कालीन सोव्हिएत युनियननंतरचा चौथा देश ठरेल.