घरट्रेंडिंगबापरे! पैसे घेण्यासाठी थेट मृतदेहच पोहचला बँकेत

बापरे! पैसे घेण्यासाठी थेट मृतदेहच पोहचला बँकेत

Subscribe

बँकेत पैसे काढण्यासाठी थेट मृतदेह गेल्याचं आपण कधी पाहिलं, ऐकलं आहे का? नाही ना! मात्र, पटनामध्ये अशीच घटना घडली आहे. यामुळे सर्वच थक्क झाले आहेत. अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्यामुळे मृतदेह थेट बँकेतच पैसे काढण्यासाठी नेला. मृतदेह बँकेत पोहोचताच बँक कर्मचाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. हा सर्व प्रकार बिहारची राजधानी पटना येथे घडला.

काय आहे संपूर्ण प्रकरण

हे प्रकरण पटना शहरालगतच्या शाहजहांपूरच्या सिग्रीवान गावतील आहे. शहरात राहणारे ५५ वर्षीय महेश यादव यांचं मंगळवारी आजाराने निधन झाले. यानंतर महेशच्या घरी ग्रामस्थ जमले. मात्र, अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने त्यासाठी पैशांची व्यवस्था कशी करावी हा प्रश्न पडला. यानंतर महेश यांच्यावर अंत्यसंस्कार त्यांच्या बँक खात्यात असलेल्या पैशांनी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर ग्रामीण बँकेत पोहोचल्यावर कर्मचार्‍यांनी महेश यांच्या बँक खात्यातून पैसे देण्यास नकार दिला. यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले. सर्वांनी मिळून महेश यांचा मृतदेह बँकेत नेण्याचा निर्णय घेतला. यानंतर सर्व ग्रामस्थांनी महेश यादव यांचा मृतदेह बँकेत नेला. महेश यादव यांचा मृतदेह बँक आवारात पोहोचताच तेथे उपस्थित कर्मचार्‍यांना मोठा धक्का बसला. ही बाब काय आहे हे कोणालाही समजू शकली नाही. यानंतर महेश यादव यांचा मृतदेह सुमारे तीन तास बँकेच्या आवारात ठेवण्यात आल. परंतु ग्रामस्थ पैसे घेतल्याशिवाय निघण्यास तयार नव्हते.

- Advertisement -

बँक मॅनेजरने खिशातून पैसे दिले

हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून बँकेच्या व्यवस्थापकाने ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. शेवटी बँक मॅनेजरने खिशातून दहा हजार रुपये देऊन प्रकरण शांत केलं. त्यानंतर गावकरी महेश यादव यांच्या मृतदेह घेऊन त्यांच्यावर अंतिम संस्कार केले. महेश अविवाहित होते आणि त्यांच्या मागे परिवार नव्हतं. वृत्तानुसार, त्याच्या बँक खात्यात १ लाख १८ हजार रुपये होते परंतु खात्यात नॉमिनी किंवा केवायसी नसल्यामुळे बँकेने त्यांचे पैसे देण्यास नकार दिला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -