घरदेश-विदेशआता तुम्ही गप्प का? स्टार क्रिकेटपटूंसह नामवंत खेळाडूंना फोगाटचा संतप्त सवाल

आता तुम्ही गप्प का? स्टार क्रिकेटपटूंसह नामवंत खेळाडूंना फोगाटचा संतप्त सवाल

Subscribe

 

नवी दिल्लीः ऑलिम्पिक आणि कॉमन वेल्थ स्पर्धेवर सोशल मीडियावर उघड भूमिका मांडणारे भारतातील स्टार क्रिकेटपटू आणि नामवंत खेळाडू कुस्ती महासंघातील लैंगिक शोषणावर गप्प का आहेत?, कोण काहीच का बोलत नाही, असा संतप्त सवाल विनेश फोगाटने केला आहे.

- Advertisement -

भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख बृजभूषण सिंग हे महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण करतात. त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी विनेश फोगाटसह अन्य पैहलवान दिल्लीत आंदोलन करत आहेत. यावेळी विनेश फोगाटने एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली. या मुलाखतीत विनेश फोगाटने नामवंत खेळाडू व क्रिकेटपटूंवर निशाणा साधला.

संपूर्ण देश क्रिकेटची पुजा करतो. असे असताना भारतीय कुस्ती महासंघात सुरु असलेल्या गैरप्रकाराबाबत कोणीही क्रिकेटपटू काहीच बोलत नाही. आमच्याच बाजूने बोला असं आमचं म्हणणं नाही. पण कोणत्याही खेळाडूवर अन्याय होऊ नये एवढा तर संदेश तुम्ही देऊ शकता. मला या गोष्टीचंच दुःख आहे की क्रिकेटर, बॅडमिंटनपटू, बॉक्सर किंवा अन्य खेळाडू याविषयी कोणीच काहीही बोलत नाही, अशी खंत विनेश फोगाटने बोलून दाखवली.

- Advertisement -

असं नाही की भारतीय खेळाडू भूमिका मांडण्यात मागे असतात. अमेरिकेतील एका आंदोलनाला भारतीय क्रिकेटर्संनी पाठिंबा दिला होता. मग आमच्या आंदोलनावर बोलण्यात अन्य खेळाडूंना काय अडचण आहे. आमच्या आंदोलनावर बोलू नका असं त्यांना कोणी सांगितलं आहे की ते व्यवस्थेला घाबरतात. आमच्या आंदोलनावर बोलणे कदाचित त्यांच्या प्रतिष्ठेला किंवा त्यांच्या ब्रॅंडला आवडणार नसेल म्हणून ते गप्प आहेत, असे प्रश्न फोगाटने उपस्थित केले.

विनेश फोगाट म्हणाली, जेव्हा आम्ही विजयी होतो किंवा पदक मिळवतो, तेव्हा आमचे कौतुक केले जाते. तसे ट्वीट क्रिकेटर करतात. मग आता काय झाले आहे. बहुधा त्यांच्यातच काहीतरी गडबड सुरु असेल, असे आम्ही गृहित धरावे का, असा आरोप करत विनेश फोगाट म्हणाली, जे आमच्या आंदोलनावर बोलत नाहीत, त्यांच्याकडे मनच नसावे. असं म्हणतात की पैहलवानाची अक्कल गुडघ्यात असते. पण आमचे सर्व अवयव योग्य त्या ठिकाणी आहेत. मात्र अन्य खेळाडूंचे अवयवय योग्य त्या ठिकणी आहेत की नाही हे तपासावे लागेल.

जर तुम्ही आमच्या आंदोलनाचे समर्थन करु शकणार नसाल तर पदक जिंकल्यावर आमचे कौतुकही करु नका. सोशल मीडियावर तुम्ही तुमचे फोटो टाकता. तुमच्या ब्रॅंडचे प्रमोशन करता. मग आम्हाला पाठिंबा देणारी पोस्ट तुम्ही टाकू शकत नाही का?. आम्ही तुमच्या समर्थनाच्या लायक नसू तर भविष्यात पदकं जिंकल्यावर आमच्या आत्मविश्वासाचे आणि मेहनतीचे कौतुक करायला येऊ नका, असा इशाराही फोगाटने दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -