घरदेश-विदेशबृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; कुस्तीपटूंच दिल्लीत आंदोलन

बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; कुस्तीपटूंच दिल्लीत आंदोलन

Subscribe

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी बुधवारी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.  भारतातील दिग्गज कुस्तीपटू दिल्लीच्या जंतरमंतर मैदानात भारतीय कुस्ती महासंघाविरोधात आंदोलन करत आहेत. कुस्ती फेडेरशन कुस्तीपटूंच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करत असून त्रास देत आहे. सोबत कुस्तीपटूंचा छळ केला जात आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटूंना फिजिओथेरपिस्ट आणि कोचही दिला गेला नाही, असा आरोप कुस्तीपटू करत आहेत.

याविरोधात आम्ही आवाज उठवला त्यावेळी आम्हाला धमक्या दिल्या देल्या गेल्या आहेत, असा आरोप भारतीय कुस्तीपटूंनी केला आहे. दरम्यान पुरुष प्रशिक्षकांकडून महिला कुस्तीपटूंना आणि महिला प्रशिक्षकांना त्रास दिला जात आहे. तसेच फेडरेशनच्या मर्जीतले प्रशिक्षकांकडून महिला प्रशिक्षकांशी गैरवर्तन केलं जात आहे. महिला कुस्तीपटूंचे कुस्ती अध्यक्षांकडून शोषण होत आहे. खेळाडूंवर कोणतेही कारण नसताना बंदी घातली जात आहे, असे गंभीर आरोप कुस्तीपटू विनेश फोगाट हिने केले आहेत.

- Advertisement -

ज्या लोकांना कुस्तीमधील काही माहिती नाही अशांना फेडरेशनच्या खुर्चावर बसवले आहे. त्यामुळे महासंघात बदला केला जावा, अशी मागणी ऑलिम्पियन आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया याने केली आहे. जोपर्यंत रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बदलले जात नाही तोपर्यंत कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार नाही, अशी भूमिका बजरंग पुनियाने मांडली आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -