घरदेश-विदेशकृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसाचार सुरुच

कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसाचार सुरुच

Subscribe

एका कृष्णवर्णीय अमेरिकन व्यक्तीचा पोलिसांकडून मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये हिंसाचार पेटला आहे.

कोरोना संकटाशी झगडत असताना अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर देशातील अनेक भागात हिंसाचार भडकला आहे. अमेरिकेच्या मिनियापोलिस व्यतिरिक्त फ्लोरिडा, जॅक्सनविले, लॉस एंजेलिस, पिट्सबर्ग, न्यूयॉर्कसह अनेक ठिकाणी लोक आंदोलन करत आहेत. मिनियापोलिसमध्ये पोलिसांच्या अमानुष मारहाणीत जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू झाला. फ्लॉइडच्या मृत्यूनंतर हिंसाचार उफाळून आला आहे. अमेरिकेच्या ५ मोठ्या शहरांमध्ये हिंसाचार सुरू आहे.

मिनिआपोलिस शहरात सोमवारी ४६ वर्षीय जॉर्ज फ्लॉइड यांच्या गळ्यावर गुडघा ठेऊन बसलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये जॉर्ज आपल्याला श्वास घेता येत नसल्याचं या पोलिसांना सांगतानाही दिसत आहेत. या प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. तर डेरेक शॉविन या ४४ वर्षीय श्वतेवर्णीय अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शॉविन यांना सोमवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे.

- Advertisement -

twitter cover

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ४ पोलिसांना बडतर्फ करण्यात आलं आहे. शिवाय, या प्रकरणाची चौकशी करण्याचे जाहीर केलं आहे. परंतु पोलिसांना अटक करुन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या हिंसक निदर्शनांच्या विरोधात अनेक ठिकाणी नॅशनल गार्ड तैनात करण्यात आले आहेत. जॉर्जियाच्या राज्यपालांनी शनिवारी आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. दरम्यान, सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरने या घटनेनंतर आपला प्रोफाइल आणि कव्हर फोटो काळा करत निषेध व्यक्त केला आहे. ट्विटर टुगेदरने आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की वंशभेद सामाजिक भेद पाळत नाही.

- Advertisement -

घटनेसंदर्भात मिनियापोलिसचे नगराध्यक्ष जेकब फ्रे म्हणाले की जॉर्ज कृष्णवर्णीय नसता तर आज तो जिवंत असता. २०२० मध्ये अमेरिकेत अशी घटना सामान्य होऊ नये, असं माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले. जॉर्जच्या मृत्यूने पुन्हा एकदा अमेरिकेत कृष्णवर्णीय आणि गोरे लोकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेत, कृष्णवर्णीय लोकांवर कित्येक वर्षांपासून अत्याचार होत आहेत.


हेही वाचा – Corona: अखेर अंतिम वर्षाच्या अंतिम सेमिस्टरची परीक्षा देखील रद्द!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -