अमेरिकेत सहा वर्षात पोलिसांच्या गोळीबार सात हजारांहून अधिक कृष्णवर्णीय लोकांचा मृत्यू!

violence in united states police has killed more than 7000 blacks in 6 years most cases in california
अमेरिकेत सहा वर्षात पोलिसांच्या गोळीबार सात हजारांहून अधिक कृष्णवर्णीय लोकांचा मृ्त्यू!

कोरोनाच्या या महासंकटात अमेरिकेतील ४६ वर्षीय कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर देशातील ३० शहरांमध्ये हिंसक आंदोलनाला वळण लागलं आहे. या वर्णद्वेषी आंदोलनाची धग आता व्हाइट हाउसपर्यंत पोहोचली आहे. अमेरिकेत वर्णभेदा विरोधातील हे पहिले आंदोलन नाही आहे. यापूर्वी देखील अनेक आंदोलने झाली आहेत.

विशेषतः अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांवर पोलिसांनी अमानूष वागणूक दिल्याच्या घटना समोर आल्या होत्या. पोलिस हिंसाचाराची नोंद ठेवणाऱ्या मॅपिंग पोलिस वायलेंसच्या माहितीनुसार, २०१३ पासून ते २०१९ पर्यंत अमेरिकेत पोलिसांच्या कारवाईत ७ हजार ६६६ कृष्णवर्णीय लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा आर्श्चयकारक आहे. अमेरिकेतील एकूण लोकसंख्येत १३ टक्के कृष्णवर्णीय लोक आहेत. पण त्यांच्यावर पोलिसांचे हल्ले जास्त होतात. काही कृष्णवर्णीय पोलिसांना देखील मारले गेले आहे.

मॅपिंग पोलिस वायलेंस मते, एका वर्षामध्ये एकही महिना असा नाही ज्यामध्ये पोलिसांच्या हातून कृष्णवर्णीय मारला गेला नाही. डिसेंबर २०१९ मध्ये एका दिवसात नऊ हून अधिक कृष्णवर्णीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. सध्या अमेरिकेत सुरू असलेल्या वर्णद्वेषी आंदोलनात व्हाउट हाउसजवळ जाळपोळ करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला आहे. यावेळी पोलिसांनी व्हाउट हाउसजवळील आंदोलनकांना बळाचा वापर करून हटवले. तसेच परिस्थिती चिघळत असल्यामुळे सिक्रेट सर्व्हिस एजेंट्सने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षेच्या कारणास्तव बंकरमध्ये लपवले होते.


हेही वाचा – ‘या’ राज्यात दारूची दुकाने दररोज उघडणार; ‘ऑड-इव्हन’ सिस्टिम केली बंद