घरताज्या घडामोडीअमेरिकेच्या 'एअर फोर्स वन'ला टक्कर देतंय, पंतप्रधान मोदींचे 'एअर इंडिया वन'

अमेरिकेच्या ‘एअर फोर्स वन’ला टक्कर देतंय, पंतप्रधान मोदींचे ‘एअर इंडिया वन’

Subscribe

भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या दौऱ्यासाठी आता ‘एअर इंडिया वन’ या विमानाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. आज दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे नवीन विमान अमेरिकेहून पोहोचले. व्हीव्हीआयपींसाठी दोन विमान विकत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यापैकी एक विमान आज सेवेत दाखल झाले आहे. ‘बोईंग ७७७ ३००’ हे विमान पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीसाठी वापरले जाईल. वायू सेनेचे पायलट हे विमान उडवणार आहेत. या विमानात एअर इंडियाची सर्वात आधुनिक आणि सुरक्षित संचार प्रणाली उपलब्ध असून हवेतही ऑडिओ आणि व्हिडिओ संवादाची सुविधा दिली जात आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘एअर फोर्स वन’च्या धर्तीवर ‘एअर इंडिया वन’मध्ये लार्ज एअरक्राफ्ट इन्फ्रारेड काऊंटर्मेशर (LAIRCAM) या तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. यामुळे विमानावर क्षेपणास्त्र हल्ला करणे शक्य होणार नाही. यासोबतच या विमानात सेल्फ प्रोटेक्शन सूट (SPS) देखील असेल.

- Advertisement -

 

- Advertisement -

काय आहेत विशेषता –

Missile approach warning system – या तंत्रज्ञानामुळे एअर फोर्स वनच्या पायलटला सेंसरच्या मदतीने क्षेपणास्त्रांवर हल्ला करण्यासाठी मदत मिळेल.

Electronic Warfare Jammer – शत्रूच्या जीपीएस आणि ड्रोन सिग्नलला ब्लॉक करण्यासाठी कामी येणारे तंत्रज्ञान

Directional Infrared Counter Measures (DIRCM) – ही क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली आहे. जी विमानाचा इन्फ्रारेड क्षेपणास्त्रापासून बचाव करेल.

chaff and flare system – रडार ट्रॅकिंग क्षेपणास्त्राचा धोका ओळखून हे तंत्रज्ञान वाफेने ढग तयार करते. त्यात विमान गुपचूपपणे आपला मार्ग बदलते.

Secure Satellite Communication Systems – या विमानात सर्वात आधुनिक सॅटेलाईट कम्युनिकेशनची सुविधा देण्यात आली आहे.

हवेत इंधन भरण्याचीही सुविधा एअर इंडिया वनमध्ये आहे. एकदा इंधन भरल्यानंतर हे विमान हवेत १७ तास उडू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -