Charlie Bit My Finger: दोन चिमुकले रातोरात कोट्यावधीश ! ५५ सेकंदाच्या व्हिडिओचा ५ कोटीत लिलाव

You Tube हा व्हिडिओ ८८३ मिलियन वेळा पाहिला गेला

Viral Charlie Bit My Finger 55-second video Sold Out Rs 5 crore an NFT
Charlie Bit My Finger: दोन चिमुकले रातोरात कोट्यावधीश ! ५५ सेकंदाच्या व्हिडिओचा ५ कोटीत लिलाव

सोशल मीडियाच्या माध्यामातून आजकाल फेमस होण्यासाठी किंवा व्हायरल होण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढले आहे. मात्र १४ वर्षांपूर्वी यू ट्यूबवर धुमाकूळ घालणाऱ्या दोन चिमुकल्यांचा व्हिडिओची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. कारण ५५ सेकंदाच्या या व्हिडिओमुळे व्हिडिओतील दोन्ही मुले आणि त्यांचे कुटुंबिय रातेरात कोट्यावधीश झाले आहेत. ‘चार्ली बीट माय फिंगर’ (Charlie Bit My Finger) असे या व्हिडिओचे नाव आहे. या व्हिडिओचा NFTच्या स्वरुपात तब्बल ५ कोटी रुपयांना लिलाव करण्यात आला आहे. लहान भाव मोठ्या भावाचे बोट चावून मोठ्याने हसणाऱ्या या दोन भावांचा व्हिडिओ यापुढे you Tube वर उपलब्ध होणार नाही. सध्या हा व्हिडिओ You tube वर पहायाला मिळत आहे. मात्र लवकरच तो काढला जाईल. (Viral Charlie Bit My Finger 55-second video Sold Out Rs 5 crore an NFT)

 

चार्ली बीट माय फिंगर हा व्हिडिओ २००७मध्ये You tube वर अपलोड करण्यात आला होता. अमेरिकेतील एका आयटी कंपनीत मॅनेजर असणाऱ्या हॉवर्झ डेविस कैर यांनी हा व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये हॅरी आणि चार्ली हे दोन भाव एका खुर्चीत बसले आहेत. चार्ली हॅरीचे बोट चावतो आणि मोठ्याने हसतो. बोट चावलेल्या हॅरीच्या चेहऱ्यावरचे भावही सगळ्यांना खिळवून ठेवतात. हा व्हिडिओ हॉवर्ड यांनी त्यांच्या आई वडिलांना पाठवण्यासाठी शुट केला होता. मात्र त्यांना तो ईमेलच्या माध्यामातून पाठवता न आल्याने त्यांनी तो यू ट्यूबवर अपलोड केला. आणि दोघेही चिमुकले रातोरात स्टॉर झाले.

You Tube हा व्हिडिओ ८८३ मिलियन वेळा पाहिला गेला आहे. सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडिओमध्ये चार्ली बीट माय फिंगर हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ शुट केला त्यावेळी हॅरी तीन वर्षांचा होता आणि चार्ली एक वर्षांचा होता. आता दोघेही मोठे झाले आहेत. हॅरी आता सहा फूट उंच झाला आहे. तर चार्ली सध्या पंधरा वर्षांचा असून आपले शिक्षण पूर्ण करत आहे. १४ वर्षांपूर्वी मजेत शुट करण्यात आलेल्या या व्हिडिओने आज कोट्यावधी पैसे कमावून दिले आहेत.


हेही वाचा – Chandra Grahan 2021: २६ मे रोजी दिसणार वर्षांतील पहिले चंद्रग्रहण,संपूर्ण वर्षात दिसणाऱ्या चार ग्रहणांची तारिख, वेळ जाणून घ्या