Viral : परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या गॉगलची चर्चा; फोटो व्हायरल

रविवारी जयशंकर यांनी स्वीडनचे संरक्षण मंत्री पॉल जॉन्सन यांची भेट घेतली. येथे दोघांमध्ये प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेवर चर्चा झाली. यानंतर जयशंकर यांनी जॉन्सनसोबत फोटोही काढला आणि तो ट्विटरवर पोस्ट केला. सोशल मीडिया युजर्सने या फोटोमध्ये जयशंकर यांच्या चष्म्यासह त्यांच्या गेटअपवरही अनेक कमेंट्स केल्या आहेत.

Viral External Affairs foreign Minister S Jaishankar s goggles went viral Jaishankar met swedish counterpart tobias bilstorm
Viral External Affairs foreign Minister S Jaishankar s goggles went viral Jaishankar met swedish counterpart tobias bilstorm

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे नेहमीच त्यांच्या धाडसी उत्तरांसाठी ओळखले जातात. जागितक मंचावरुन त्यांनी अनेकदा पाकिस्तानला खरी खोटी सुनावली आहे. त्यांच्या या हजरजबाबीपणाचे भारतीय फॅन आहेत. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. परंतु आता मात्र एका वेगळ्याच कारणामुळे एस जयशंकर हे चर्चेचा विषय ठरले आहेत. यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खरं तर, रविवारी जयशंकर यांनी स्वीडनचे संरक्षण मंत्री पॉल जॉन्सन यांची भेट घेतली. येथे दोघांमध्ये प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेवर चर्चा झाली. यानंतर जयशंकर यांनी जॉन्सनसोबत फोटोही काढला आणि तो ट्विटरवर पोस्ट केला. सोशल मीडिया युजर्सने या फोटोमध्ये जयशंकर यांच्या चष्म्यासह त्यांच्या गेटअपवरही अनेक कमेंट्स केल्या आहेत. ( Viral External Affairs foreign Minister S Jaishankar s goggles went viral Jaishankar met swedish counterpart tobias bilstorm )

काय म्हणाले सोशल मीडिया यूजर्स?

जयशंकर यांच्या ट्विटवर कमेंट्सचा पूर आला आहे. @IsolatedMonk नावाच्या युजरने लिहिले, “सर चष्मे बडे सेक्सी लग रहे की किधर से लिए?” तसचं, इतर अनेक युजर्सने त्यांना स्टायलिश, रॉकस्टार आणि सुपरस्टार ऑफ इंडिया देखील म्हटलं आहे. @RKMishraEr युजरने लिहिले, “चांगला चष्मा सर, मिस्टर मोदीजींचा प्रभाव आता तुमच्या ड्रेसिंग स्टाईलवरही दिसून येत आहे.”

एका अन्य युजरनं @pkpitre म्हणाला की , “छान सर, तुम्ही हिरो आहात आणि भारताचे 007 जेम्स बाँड देखील आहात.” ओंकार नावाच्या युजरने लिहिले- ‘Men in White, भारताचे टेलर चांगले आहेत.’ एका युजर @TrustScore लिहिले की, “टॉम क्रूझ आणि ब्रॅड पिट यांच्यासमोर आता आव्हान आहे, असं म्हणाला. एस जयशंकर यांच्या या फोटोवर आता अनेक मजेशीर कमेंट्स येत आहेत.

( हेही वाचा: Siddaramaiah or DK Shivakumar कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण? आज दिल्लीत काँग्रेस हायकमांड घेणार निर्णय )

 

जयशंकर यांनी ट्विट केलं की , भारत आणि स्वीडनमधील राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्वीडनचे परराष्ट्र मंत्री टोबियास बिलस्ट्रॉम यांच्याशी विस्तृत चर्चा झाली. द्विपक्षीय सहकार्य उच्च पातळीवर नेण्यासाठी वचनबद्ध असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. इंडो-पॅसिफिक, युरोपमधील धोरणात्मक परिस्थिती आणि जागतिक अर्थव्यवस्थेला धोकामुक्त करण्याबाबत विचारांची देवाणघेवाण केल्याचंही जयशंकर म्हणाले.