Eco friendly bappa Competition
घर ट्रेंडिंग आता पाकिस्तानातही 'नाटू-नाटू' ची क्रेझ! हूक स्टेप्स फॉलो करत केला भन्नाट डान्स

आता पाकिस्तानातही ‘नाटू-नाटू’ ची क्रेझ! हूक स्टेप्स फॉलो करत केला भन्नाट डान्स

Subscribe

हा व्हिडीओ एका पाकिस्तानी लग्नामधील दिसत आहे. या सोहळ्यातील वऱ्हाडी मंडळी आरआरआरच्या नाटू-नाटू गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ चित्रपट रिलीज झाल्यापासूनच त्यातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. हे गाणे इतकं लोकप्रिय झालंय की, अलीकडेच ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याच्या पुरस्कारानेही गौरवण्यात आले. गाण्याचे सूर, त्याचे स्टेप्स आणि बोल इतक्या एनर्जीने भरलेले आहेत की, या गाण्यावर कोणीही नाचू लागेल. एकीकडे संपूर्ण जग गाण्यावर नाचताना दिसतोय, दुसरीकडे शेजारील देश पाकिस्तानातील लोक सुद्धा स्वतःला या गाण्यावर थिरकण्यापासून रोखू शकले नाहीत. एका पाकिस्तानी लग्नात या गाण्यावर लोक डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

भारतीय उद्योगपती हर्ष गोएंका ट्विटरवर खूप सक्रिय असतात आणि अनेकदा मजेदार फोटो आणि व्हिडीओ ट्विट करत असतात. अलीकडेच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका पाकिस्तानी लग्नामधील दिसत आहे. या सोहळ्यातील वऱ्हाडी मंडळी आरआरआरच्या नाटू-नाटू गाण्यावर नाचताना दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्विट करत हर्ष गोएंकांनी एक कॅप्शन देखील लिहिली आहे. “पाकिस्तानमध्ये कोणतं गाणं लोकांना खूप आवडतं याचा अंदाज लावा!” असं लिहीत हा व्हिडीओ शेअर केलाय.

- Advertisement -

या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा कुर्ता-पायजमा घातलेला तरुण आणि शरारासारखा ड्रेस घातलेली मुलगी एकत्र नाचताना दिसत आहे. त्यांच्या मागे प्रेक्षक उभे असलेले दिसून येत आहेत. त्यांच्या डान्सचा आनंद लुटताना ते दिसतात. दोघांनीही गाण्याच्या हूक स्टेप्स तंतोतंत कॉपी केल्या आहेत. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी गाण्यात ज्या उर्जेने डान्स केला आहे अगदी त्याच उर्जेने दोघे नाचत आहेत.

- Advertisement -

या व्हिडीओला १७ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने सांगितले की, नाटू-नाटू हे गाणं ग्लोबल सेंसेशन बनलंय आणि पाकिस्तानी लोकांनाही याचं वेड लागलंय. त्यामुळे त्यांचे स्वागत आहे. तर आणखी दुसऱ्याने कमेंट केलं की, संगीत आणि कलेला सीमा नसते. तिसऱ्या युजरने सांगितले की, गाण्याचे सूर अतिशय आकर्षक असून उत्कृष्ट कोरिओग्राफी केली आहे. या व्हिडीओमध्ये नाचणारी मुलगी प्रत्यक्षात हानिया अमीर नावाची पाकिस्तानी अभिनेत्री असल्याचं सांगण्यात येत आहे.

- Advertisment -