घरताज्या घडामोडीUAEमध्ये मुसळधार पाऊस, पाण्यात बुडाली वाहनं; व्हिडीओ व्हायरल

UAEमध्ये मुसळधार पाऊस, पाण्यात बुडाली वाहनं; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

संयुक्त अरब अमीरातमध्ये मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक भागात महापूर आला होता. अनेकांचं जनजीवन सुद्धा विस्कळीत झालं होतं आणि वाहनं पाण्यात बुडाली होती. दरम्यान या महापूराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शारजाह आणि फुलैराह भागातील लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. तसेच या दोन शहरांना सर्वाधिक महापूराचा फटका बसला आहे.

- Advertisement -

दुबई आणि अबुधाबीमध्ये या ठिकाणांपेक्षा कमी पाऊस नोंदवण्यात आला आहे. अनेक लोकं हॉटेल आणि इतर ठिकाणी आसरा घेताना दिसले. ट्विटरवरील व्हिज्युअलमध्ये फुजेरियामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या पाण्याखाली पूर्णपणे बुडलेल्या दिसतातय. हे पाणी कळबा मार्केटमध्ये शिरताना दिसत आहे.

- Advertisement -

आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये पुरामुळे शहराच्या प्रवेशद्वाराचे नुकसान झाले आहे. खड्डेमय रस्त्यांवर गाड्या फिरताना दिसतायत. UAE च्या पूर्व भागात पावसामुळे अचानक पूर आला.त्यामुळे घरांचे नुकसान झाले असून अनेक वाहने वाहून गेली आहेत. लोकांच्या बचावासाठी तैनात असलेल्या लष्कराच्या वाहनांचेही नुकसान झाले. अमिरात हवामान खात्याने आधीच खराब हवामानाचा इशारा दिला होता. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचेही सांगण्यात आले.

द नॅशनल या वृत्त पत्रानुसार, आपत्कालीन कामगारांनी सुमारे ९०० लोकांना वाचवले. शारजाह आणि फुजेरियामध्ये ३ हजार ८९७ लोकांना तात्पुरता निवारा देण्यात आला असून ते घरी परत येईपर्यंत ते तिथेच राहतील, असेही सांगण्यात आले आहे.


हेही वाचा : ऑगस्टपासून होणार हे पाच मोठे बदल, आताच जाणून घ्या!


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -