घरताज्या घडामोडीVIDEO : 'या' व्यक्तीने व्हेल माशाच्या पाठीवरुन केली सफर

VIDEO : ‘या’ व्यक्तीने व्हेल माशाच्या पाठीवरुन केली सफर

Subscribe

बऱ्याच जणांचे स्वप्न असते की, एखाद्या मोठ्या माशाच्या पाठीवर बसून सफर करावी. मात्र, हे सत्यात उतरणे जरा कठीणच आहे. परंतु, हे स्वप्न न राहता एका व्यक्तीच्या बाबतीत खरंच घडले आहे. एका तरुणांने धाडस करुन व्हेल माशाच्या पाठीवर उडी मारली आणि सफर देखील केली. या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

- Advertisement -

काय आहे या व्हिडीओत?

ही व्यक्ती बोटीतून प्रवास करत असताना व्हेल शार्क माशाच्या पाठीवर उडी मारण्याचे धाडस करताना दिसत आहे. आधी उडी चुकू नये, म्हणून एक दोन वेळा अंदाज घेत उडी घेतात. व्हेल शार्क मासाही थोडा वेगाने त्याना ढकलून देण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तोपर्यंत ती व्यक्ती माशाचे कल्ले पकडून त्याच्यावर नियंत्रण मिळवते आणि प्रवास करते.

- Advertisement -

 

हा व्हिडीओ १६ ऑगस्टला सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ १४ हजारहून अधिक लोकांनी पाहिला असून अनेक युझर्सनी या व्यक्तीच्या धाडसाचे कौतुक केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी मात्र, टीकेची झोड उठवली आहे. अशा पद्धतीने माशांना त्रास दिल्याने ते हल्ला करतात असेही काही युझर्सनी म्हटले आहे.


हेही वाचा – वय वर्षे ६५ आणि १८ महिन्यांत तिला झाली ८ मुलं! भ्रष्टाचाराचा अव्वल नमुना!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -