घरट्रेंडिंगVideo : जामियात पोलिसांची विद्यार्थ्यांना मारहाण!

Video : जामियात पोलिसांची विद्यार्थ्यांना मारहाण!

Subscribe

देशाची राजधानी दिल्ली येथील जामिया मिलिया विद्यापीठात घुसून  दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. CAA  आणि NRC कायद्याविरोधात आंदोलन करत असताना काही विद्यार्थ्यांनी हिंसक कृत्य केल्याचे पोलिसांनी म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी विद्यापीठात घुसून लायब्ररीत बसलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असून त्यावर अनेकांनी आपली मते मांडली आहेत.

Jamia Coordination Committee ( @Jamia_JCC)  या ट्विटर अकाऊंटवरून  १६ फेब्रुवरीला मध्यरात्री ०१:३७ मिनिटांनी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ४५ सेकंदांच्या या व्हिडिओत विद्यार्थी कॉलेजच्या लायब्ररीत बसलेले असताना अचानक पोलीस येतात आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करतात असे दिसत आहे. हा व्हिडिओ १५ डिसेंबर २०१९ चा असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर काही वेळातच तो व्हयरल झाला आहे. यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहे.

१) प्रियंका गांधी

- Advertisement -

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटले कि, ‘बघा दिल्ली पोलीस विद्यार्थ्यांना अंदाधुंदपणे मारत आहे. एक मुलगा पुस्तक दाखवतोय पण पोलीस लाठीचार्ज करतायत. गृहमंत्री आणि दिल्ली पोलीस दलातील अधिकारी खोटं बोलले की, त्यांनी लायब्ररीत घेऊन विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज नाही केला. हा व्हिडिओ समोर आल्याने जामियात झालेल्या हिंसेवर कारवाई झाली नाही तर सरकारची नियत देशासमोर येईल’.

- Advertisement -

२) बाळासाहेब थोरात

महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे कि, CCTV फुटेजच्या आधारे मिळालेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसतेय कि दिल्ली पोलिसांनी विद्यापीठात घुसून अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला केला. याबाबत दिल्ली पोलिसांवर कडक कारवाई झाली पाहिजे.

३) अनुराग कश्यप

आपली भूमिका परखडपणे मांडणारे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनीही या व्हिडिओ बाबत आपली प्रतिक्रया दिली आहे. भाजपवर हल्ला चढावत ते म्हणाले, ‘CCTV च्या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतंय कि दिल्ली पोलिसांनी कशाप्रकारे लायब्ररीत अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. भाजप आणि अमित शहा यांच्या सरकारने सर्व लोकांसमोर आणि पत्रकारांसमोर त्यांना देशद्रोही बोलत असत्य पसरवले. हेच आहे भाजपच्या दहशतवाद्यांचे सत्य.

४) स्वरा भास्कर

अभिनेत्री स्वर भास्कर हिनेसुद्धा यावर व्यक्त होत लिहिले कि, ‘निःशब्द आणि धक्कादायक व्हिडिओ. कुठे थांबणार दिल्ली पोलीस? अमानुषपणाची देखील सीमा असते.

५) कुणाल कामरा

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने दिल्ली पोलिसांना टॅग करत टोला लगावला कि, ‘महात्मा गांधींना तुमचा अभिमान वाटला असता…

या व्हिडिओवरून सोशल मीडियावर वातावरण चांगलेच तापले असून त्यावर अनेक प्रतिकिया आणि राजकारण होताना दिसत आहे. दरम्यान, दिल्लीचे विशेष आयुक्त प्रवीण रंजन यांनी ANI शी बोलताना सांगितलं कि, या व्हिडिओ बद्दल आम्ही माहिती घेतले असून याबाबत अधिक तपास केला जाईल.

एकूणच जामिया मिलिया विद्यापीठात झालेल्या हिंसेमुळे दिल्ली पोलिसांबद्दल देशभरात तीव्र नाराजी असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आता दिल्ली पोलीस आणि गृहखाते यावर काय पाऊल उचलते हे पाहावं लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -