घरताज्या घडामोडीविकृतीची हद्द! मांजरीच्या पिल्लाला जिवंत जाळले, व्हिडीओ व्हायरल!

विकृतीची हद्द! मांजरीच्या पिल्लाला जिवंत जाळले, व्हिडीओ व्हायरल!

Subscribe

माहिती देणाऱ्यांना ५० हजारांच्या बक्षिसाची घोषणा

गेले काही दिवस सतत प्राणांवर होणारे अत्याचार समोर येत आहेत. केरळमध्ये हत्तीवर झालेल्या अत्याचारानंतर अनेक घटनासमोर आल्या. एक मांजरीच्या पिल्लाला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राण्यांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल (HSI)या एनजीओने या अमानुष प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.

माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस

ज्या कोणी हे निर्घृण कृत्य केलं आहे, त्याची माहिती देणाऱ्यांना ५० हजार रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, या घटनेबाबत काहीही माहिती असेल तर [email protected] या आयडीवर इ-मेल किंवा +91 7674922044 या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

- Advertisement -

काय आहे व्हिडिओत

अंधारात एका मांजरीच्या पिल्लाला लायटरने जाळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गवतावर बसलेलं हे पिल्लू आग लागल्यानंतर सैरावैरा पळत सुटतं आणि काही क्षणांमध्येच शेवटचा श्वास घेतला. व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि कुठे ही घटना घडली याबाबतची माहिती मिळालेली नाहीये. पण, हा व्हिडिओ एका ट्विटर युजरने एचएसआयच्या निदर्शनास आणून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

एचएसआयने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. ह्युमन सोसायटी इंटरनॅशनलचे भारतातील मॅनेजिंग डायरेक्टर आलोकपर्णा सेनगुप्ता यांनी आवाहन केलं आहे की, जर तुमच्याकडे या घटनेबाबत काहीही माहिती असेल तर [email protected] या आयडीवर इ-मेल किंवा +91 7674922044 या नंबरवर कॉल करुन देऊ शकतात. एका लहान, असहाय्य मांजरीच्या पिल्लाला जिवंत पेटवण्यात आले. असे कृत्य करणारा व्यक्ती इथेच थांबणार नाही. त्याने आधी किती प्राण्यांसोबत असं कृत्य केलंय ते नंतर कळेल, पण त्यासाठी त्याच्यावर तातडीने कारवाई होणं गरजेचं आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – कोरोनामुळं ३ सख्ख्या भावांचा मृत्यू! कुटुंबातील १८ सदस्यांनाही लागण!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -