घरदेश-विदेशVideo: खऱ्याखुऱ्या मांजरीचा रॅम्पवर 'कॅट'वॉक

Video: खऱ्याखुऱ्या मांजरीचा रॅम्पवर ‘कॅट’वॉक

Subscribe

मांजरीने केलेल्या या खऱ्याखुऱ्या 'कॅट'वॉकमुळे शो पाहायला आलेले लोक भलतेच खुष झाले.

‘कॅटवॉक’ हा बहुतांशी फॅशशोचा मुख्य गाभा असतो. फॅशन शोमध्ये रॅम्पवर चालण्यासाठी मॉडेल्स कॅटवॉकचं खास प्रशिक्षणही घेतात. मांजरीसारखी नखरेल पण तितकीच डौलदार चाल शिकणं ही एक लकब असते, जी शिकण्यासाठी मॉडेल्स ट्रेनिंग घेतात. आजवर तुम्ही फॅशन शोजमध्ये अनेक मॉडेल्सना किंवा बॉलीवूड अभिनेत्रींना शानदार रॅम्पवॉक करताना पाहिलं असेल. अनेक जगविख्यात ब्रँड्सचे कपडे, दागिने किंवा फुटवेअर प्रमोट करण्यासाठी मॉडेल्स फॅशन शोमध्ये लकबदार ‘कॅट’वॉक करताना दिसतात.  मात्र, खरीखुरी मांजरच रॅम्पवर येऊन ‘कॅट’वॉक करायली लागली, तर हे हे दृष्य नक्कीच दुर्मिळ ठरेल. ज्या मांजरीच्या चालीवरुन ‘कॅट’वॉक हे नाव पडलं आहे, त्या मांजरीला प्रत्यक्षात कॅटवॉक करताना बघण्याची मजाच काही और असेल. हीच दुर्मिळ मजा तुर्कीतल्या एस्मोड आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये अनुभवायला मिळाली.

 

View this post on Instagram

 

Ahahahahahah #catwalk #real #vakkoesmod

A post shared by H (@hknylcn) on

- Advertisement -

इस्तंबुलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका फॅशन शोमध्ये रॅम्पवर अचानक एक मांजर येऊन बसलं. मांजर रॅम्पवर आल्यामुळे शोमध्ये व्यत्यय येईल अशी तिथल्या लोकांना आणि आयोजकांना भीती होती. मात्र, शोमधील मॉडेल्सनी आपला रॅम्पवॉक तसाच सुरु ठेवला आणि छोटीशी मांजरही आपल्या जागेवरुन हलली नाही. काहीवेळातच ती मांजर जागेवरुन उठली आणि तिने रॅम्पवर चालायला सुरुवात केली. या खऱ्याखुऱ्या कॅटवॉकमुळे शो पाहायला आलेले लोक भलतेच खुष झाले. त्यातील काही लोकांनी हा दुर्मिळ व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओ व्हायरल होत असून, जगभरातील लोक त्यावर भरभरुन कमेंट करत आहे. या प्रकारामुळे लोकांना खरं ‘कॅटवॉक’ काय याची प्रचिती आली असणार हे नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -