Homeट्रेंडिंगViral Video : बाळासाठी दूध आणायला आई ट्रेनमधून उतरली आणि गाडी सुटली;...

Viral Video : बाळासाठी दूध आणायला आई ट्रेनमधून उतरली आणि गाडी सुटली; वाचा नेमकं काय घडलं?

Subscribe

आई-मुलाचं प्रेमळ नातं कसं असतं, हे सागणारे अनेक धडे पुस्तकात छापण्यात आले. सध्याच्या बदलत्या युगात आईचं मुलावरील प्रेम बऱ्याचदा चित्रपटात किंवा छोट्या पडद्यांवर पाहायला मिळतं. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मुंबई : आई-मुलाचं प्रेमळ नातं कसं असतं, हे सागणारे अनेक धडे पुस्तकात छापण्यात आले. सध्याच्या बदलत्या युगात आईचं मुलावरील प्रेम बऱ्याचदा चित्रपटात किंवा छोट्या पडद्यांवर पाहायला मिळतं. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका आईची मुलावरील माया प्रत्यक्षात पाहायला मिळाली. हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. पण या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या आई-मुलाच्या प्रेमळ नात्याला निमित्त ठरला तो ट्रेनचा गार्ड. विशेष म्हणजे या ट्रेन गार्डवर सर्वच स्तरावरून कौतुकांचा वर्षाव होत आहे. (viral video the train guard helped the mother who was desperate to meet her son in train)

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?

सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. @lay_bhari_official या अकाउंटवरून हा शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ट्रेनमधून प्रवास करणारी महिला ट्रेन स्टेशनवर थांबली असताना मुलासाठी दूध विकत घेण्यासाठी खाली उतरली होती. पण ती मुलासाठी दूध घेऊन येईपर्यंत ट्रेन सुटली. मुलगा ट्रेनमध्ये आणि आई ट्रेनच्या बाहेर प्लॅटफॉर्मवर अशी परिस्थिती या व्हिडीओमध्ये दिसते. मुलगा ट्रेनमध्ये असल्याने आईच्या डोळ्यातील अश्रूचा बांधा फुटला आणि तिने थेट चालत्या ट्रेनच्या दिशेने धाव घेतली. पण त्याचवेळी स्थानकावर उपस्थित असलेला ट्रेन गार्डने गाडी थांबवली. गार्डने दाखवलेल्या या माणुसकीचे सोशल मीडियावर अनेक जण कौतुक करीत आहेत.

हा व्हिडीओला आतापर्यंत एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट्स करत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडीओ पाहून खरंच भावूक व्हायला होतं. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाला.


हेही वाचा – ISRO : चांद्रयान-3 चे एस सोमनाथ इस्रो सोडणार; नवे अध्यक्ष व्ही. नारायणन कोण?