Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Viral Video : रिव्हॉल्व्हरसह इन्स्टाग्राम रील करणं महिला कॉन्स्टेबलला पडलं भारी, द्यावा...

Viral Video : रिव्हॉल्व्हरसह इन्स्टाग्राम रील करणं महिला कॉन्स्टेबलला पडलं भारी, द्यावा लागला राजीनामा

Related Story

- Advertisement -

रिव्हॉल्व्हरसह इन्स्टाग्राम रील करणं उत्तर प्रदेशातील महिला कॉन्स्टेबलला चांगलं महागात पडलं आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील या महिला कॉस्टेबलने इन्स्टाग्रामवर गणवेशामध्ये रिव्हॉल्व्हर फिरवत एक रील तयार केला होता. त्यानंतर त्यांना लाइन अटॅच करण्याच आले होते. प्रियंका मिश्रा असं या महिला कॉस्टेबल नाव आहे. या सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ज्यामुळे अस्वस्थ होऊन तिने राजीनामा दिला होता, तो आता मंजूर करण्यात आला आहे.

प्रियांकाने पोलीसांच्या वर्दीत असताना हातात रिव्हॉल्व्हर घेऊन एक व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यात प्रियांका एखाद्या गँगस्टरप्रमाणे हावभाव करताना दिसतेय. य़ा रिलमध्ये जोडलेल्या ऑडिओमध्ये असे म्हटले आहे की, ना गुंडागर्दीवर गाणे बनवत, ना जाट गुर्जर गाडीवर लिहत, आमच्याकडे पाच-पाच वर्षांची मुलंही कट्टा चालवतात.

- Advertisement -

कॉन्स्टेबल प्रियांका व्हायरल झालेला हा व्हिडिओ २४ ऑगस्ट रोजी आग्रामधील वरिष्ठ पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहचला. यानंतर तात्काळ कारवाईचे आदेश देत प्रियांका मिश्राला लाइनवर घेण्यात आले. मदन मोहन गेट पोलीस स्टेशनमध्ये प्रियांका तैनात होती. दरम्यान तिच्याविरोधात गुन्हा दाखल होताच चौकशी करण्यात आली होती.

या कारवाईनंतर प्रियांकाला सोशल मीडियाव बरचं ट्रोल करण्यात आलं. यात तिला नोकरीवरून काढून टाकण्याची मागणी केली जात होती. यानंतर तिने अस्वस्थ होऊ एक नवा व्हिडिओ शेअर करत आग्रा एसएसपीकडे आपला राजीनामा सादर करत असल्याचे सांगितले, मात्र ट्रोलर्सने अशा प्रकारचे ट्रोलिंग करणे थांबवा असे आवाहन तिने केले आहे.


मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य; नारायण राणेंची रायगड पोलिसांसमोर हजेरी


- Advertisement -

 

- Advertisement -