‘विरुष्का’ पुन्हा देणार गुडन्यूज?, चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधाव विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याचा पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) पुन्हा एकदा गोड बातमी देणार असल्याचा चर्चांना उधाण आले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधाव विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याचा पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) पुन्हा एकदा गोड बातमी देणार असल्याचा चर्चांना उधाण आले आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मुंबईच्या एका रुग्णालयातून (Hospital) बाहेर येताना दिसले. यासंदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. (virat kohli and anushka sharma spotted in hospital fans says good news)

या व्हायरल व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा पती विराटसोबत रुग्णालयातून बाहेर येत आहे. त्यामुळे अनुष्का पुन्हा एकदा गुडन्यूज देणार का, अशा चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहेत. शिवाय या व्हायरल पोस्टमध्येही अनेकांनी कमेंट करत याबाबत विचारणा केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

आयपीएल २०२२ चे यंदाचे १५ वे पर्व

इंडियन प्रिमियर लीग आयपीएल २०२२ चे यंदाचे १५ वे पर्व होते. हे पर्व संपल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघाचा माजी कर्णधार विराट कोहली, अनुष्का शर्मा आणि त्यांची मुलगी वामिका सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मालदीवमध्ये गेले होते. यावेळी मालदीवमध्ये दोघेही आनंदी असून याबाबतचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

विराट कोहलीने त्याचा शर्टलेस फोटो शेअर केला होता, तर अनुष्काचा मोनोकिनी लूकचा फोटोही व्हायरल झाला होता. दरम्यान, विराट आणि अनुष्का नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो टाकून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. ‘विरुष्का’ यांच्या लग्नापासून ते अगदी मुलगी वामिका होईपर्यंत चाहत्यांनी या दोघांना भरघोस प्रेम दिले.

भारतीय संघ इंग्लंड दौरा करणार

येत्या आगामी काळात भारतीय संघ इंग्लंड दौरा करणार आहे. या दौऱ्याला विराट कोहली याच आठवड्यात इंग्लंडला रवाना होणार आहे. तर अनुष्का शर्मा तिचा आगामी चित्रपट चकदा एक्सप्रेसमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अनुष्का भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे.


हेही वाचा – Ravi Shastri: मानसिक थकवा टाळण्यासाठी विराटनं ब्रेक घ्यावा, माजी प्रशिक्षकांचं मोठं वक्तव्य