घरCORONA UPDATEकोरोनाविरोधी लढ्यात विराट-अनुष्काही उतरले; केली दोन कोटींची मदत 

कोरोनाविरोधी लढ्यात विराट-अनुष्काही उतरले; केली दोन कोटींची मदत 

Subscribe

या दोघांनी मिळून केट्टो (ketto) या क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून निधी जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि सरकारला मदत करण्यासाठी समाजातील अनेक हात पुढे येत आहेत. कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने पुढाकार घेतला आहे. या दोघांनी मिळून केट्टो (ketto) या क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून निधी जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर या दोघांनी एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी ७ कोटींचा निधी गोळा करण्यात येणार असून विराट आणि अनुष्काने मिळून दोन कोटींची मदत केली आहे.

- Advertisement -

सर्वांनी एकत्र येऊन मदत करण्याची गरज

देशातील आरोग्य यंत्रणा न थकता, न थांबता कोरोनाला लढा देत आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आपल्या आरोग्य यंत्रणेला मोठे आव्हान दिले आहे. आता आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला मदत करण्याची गरज आहे. अनुष्का आणि मी, आम्ही मिळून केट्टोवर एक मोहीम सुरू केली आहे. त्यातून जमा होणारा निधी हा कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी वापरला जाणार आहे. तुमचे योगदानही महत्वाचे आहे. लोकांचे आयुष्य वाचवण्यासाठी छोटीशी मदतही खूप मोठी असते, असे विराट आणि अनुष्का या व्हिडिओत म्हणाले.

७ कोटी जमा करण्याचे लक्ष्य

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे भारतातील कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी ७ कोटी रुपयांचा निधी जमा करण्याचे लक्ष्य आहे. ते केट्टो (ketto) या क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा निधी गोळा करणार असून त्यांनी स्वतः दोन कोटींची मदत केली आहे, असे विराट आणि अनुष्काने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले होते. ही मोहीम पुढील सात दिवस चालणार असून एकूण ७ कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -