घरताज्या घडामोडीकोहलीनंतर RCB चे नेतृत्व कोणाकडे ? विराटचा कर्णधारपदाचा राजीनामा

कोहलीनंतर RCB चे नेतृत्व कोणाकडे ? विराटचा कर्णधारपदाचा राजीनामा

Subscribe

विराट कोहली लवकरच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चे कर्णधारपद IPL 2021 च्या सिझन संपुष्टात येणार आहे. रविवारी संध्याकाळी दुबईत चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध मुंबई इंडियन्स हा सामना सुरू असतानाच ही बातमी समोर आली. कोहलीने काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाच्या टी २० संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर रोजी ही टी २० विश्वचषक संपुष्टात येताना कोहली या फॉरमॅटच्या कर्णधार पदापासून मुक्त होणार आहे. (Virat kohli resign from captaincy of RCB by end of IPL 2021)

कोहली या टी २० विश्वचषकाच्या दरम्यान ३३ वर्षांचा होणार आहे. विराट कोहली हा २०१३ पासून रॉयल चॅलेंजर्सचा कॅप्टन आहे. तर फ्रॅंचायसीचा भाग म्हणून तो २००८ पासून संघात आहे. विराटच्या आरसीबी सोबतच्या १३२ सामन्यांचा रेकॉर्ड हा धोनीनंतरचा एक विक्रम आहे. धोनीने १९६ आयपीएलचे सामने चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळले आहेत. पण विराटच्या नेतृत्वात आरसीबीला एकदाही आयपीएलचा चषक जिंकता आलेला नाही. कोहलीचा याआधीचा सर्वात बेस्ट आयपीएल सिझन हा २०१६ साठीचा होता. या सिझनमध्ये कोहलीने ऑरेंज कॅप मिळवतानाच सर्वाधिक धावा केल्या होत्या. तसेच संघाला अंतिम सामन्यापर्यंतही नेण्यासाठीचे नेतृत्व केले होते. या सामन्याक आरसीबीला सन रायजर्सकडून पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर २०१६ मध्ये आरसीबीने २०१५ आणि २०२० मध्ये प्ले ऑफपर्यंत मजल मारली होती.

- Advertisement -

काय म्हटलय कोहलीने ?

ही आयपीएलची मालिका माझ्यासाठी RCB चा कॅप्टन म्हणून शेवटची मालिकी आहे. पण मी आरसीबीचा खेळाडू म्हणून यापुढेही आयपीएल खेळणार आहे. मी माझ्या सर्व आरसीबी फॅन्सना मला आतापर्यंत सपोर्ट केल्यासाठी सर्वांचे आभार मानत आहे – विराट कोहली

माझ्यासाठी हा सोपा निर्णय नव्हता. पण संघाच्या हितासाठी मी हा निर्णय गेत आहे. मी जोवर क्रिकेट खेळत राहीन तोवर संघासोबत राहीन असेही कोहलीने स्पष्ट केले आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आतापर्यंत RCB ने सात सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत. कोहलीला टी २० सामन्यांसाठीच्या नियोजनाची आणि स्ट्रॅटेजी तयार करण्याच्या जबाबदारीतून मुक्त व्हायचे होते. त्यामुळेच भारत आणि रॉयल चॅलेंजर्सच्या कर्णधार पदावरून पायउतार करण्याच्या तयारीत कोहली असल्याचे कळते.

- Advertisement -

रविवारी कोहलीने संघाला आपण कर्णधार पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगत संघासोबतही सरावादरम्यान चर्चा केली. आयपीएलच्या हंगामाचा दुसरा भाग सुरू होण्याआधीच मी संघाशी बोललो आहे. यंदाचा हंगाम हा माझा शेवटचा हंगाम असेल असेही मी संघाला सांगितले आहे. माझ्या मनात अनेक दिवसांपासून हा विषय होता. म्हणूनच मी टी २० कर्णधारपदाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला, त्यापाठोपाठच आता आरसीबी संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामाही दिला आहे.

मला यापुढच्या काळातही अतिशय मनसोक्तपणे क्रिकेट खेळणार आहे. मला यापुढच्या काळात काय करायचे आहे, हेदेखील माहित आहे. आरसीबी सध्या बदलाच्या टप्प्यात आहे, तसेच मोठ्या प्रमाणात लिलाव प्रक्रियाही आगामी काळात होणार आहे, याचीही मला कल्पना असल्याचे कोहलीने स्पष्ट केले. मी यापुढच्या काळातही वचनबद्द असेन तसेच मला दिलेल्या जबाबदाऱ्या या पुर्णपणे पार पाडेन असेही कोहलीने स्पष्ट केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -