घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकोरोनाला हरवण्यासाठी भारतानं 'हे' करावं; सुप्रसिद्ध विषाणूतज्ज्ञ इयान लिपकिन यांचा सल्ला!

कोरोनाला हरवण्यासाठी भारतानं ‘हे’ करावं; सुप्रसिद्ध विषाणूतज्ज्ञ इयान लिपकिन यांचा सल्ला!

Subscribe

जगभरात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरू असतान भारतात मात्र धिम्या गतीने कोरोना पसरत आहे. अजूनही भारत कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजमध्ये पोहोचलेला नाही. भारताकडून कोरोनाविरोधात दिल्या जाणाऱ्या लढ्याचं जगभरात कौतुक होत आहे. मात्र, असं असलं, तरी भारताने संभाव्य फैलाव टाळण्यासाठी जास्त काळजी घेण्याची गरज देखील व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्हायरोलॉजिस्ट डॉ. इयान लिपकिन यांनी भारताने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करायला हवं, याबाबत काही महत्त्वपूर्ण सल्ले दिले आहेत. तसेच, चीनने कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेत बनवला आहे या दाव्याला देखील त्यांनी तीव्र विरोध केला आहे.

भारतापुढे एकच पर्याय…!

भारतातली आरोग्य यंत्रणा कोरोनाचा सामना करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. त्याशिवाय, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, सरकार देखील कोरोनाविरोधातल्या लढ्यामध्ये कंबर कसून उतरलं आहे. पण भारताला जर कोरोनाला रोखायचं असेल, तर लॉकडाऊन आणि लॉकडाऊनला यशस्वी करायचं असेल, तर मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या चाचण्या आणि क्लस्टर आयसोलेशन म्हणजे मोठ्या संख्येने लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवणं हाच उपाय आहे, असं मत इयान लिपकिन यांनी व्यक्त केलं आहे. सोशल डिस्टन्सिंग म्हणजेच सामाजिक अंतर ठेवणं हाच कोरोनावर सर्वात उत्तम उपाय आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. लिपकिन यांना स्वत:ला कोरोनाची लागण झाली होती. त्याचा त्यांनी यशस्वीपणे सामना केला असून ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत.

- Advertisement -

भारतात एक समस्या आहे…

लिपकिन यांनी भारतात लॉकडाऊन वाढवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. ‘भारतात सध्या लॉकडाऊनच्या माध्यमातून कोरोनाशी लढा सुरू आहे. पण कोरोनाला रोखण्याचा सर्वात प्रभावी उपाय सोशल डिस्टन्सिंग हाच आहे. भारतात परिस्थिती कधी सामान्य होईल, याची काही निश्चित तारीख सांगता येणार नाही. पण जर सरकारने जास्तीत जास्त चाचण्या केल्या आणि आयसोलेशनवर लक्ष केंद्रीत केलं, तर त्याचा फायदा होऊ शकेल’, असं लिपकिन म्हणाले. ‘माझं भारतावर नक्कीच प्रेम आहे. पण भारतात एक समस्या आहे. इथे लोकं जेवणासाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यातून जितके प्रयत्न प्रशासन करत आहे, ते व्यर्थ ठरत आहेत. आपल्याला असा मार्ग शोधावा लागेल, ज्यामुळे दारिद्र्य रेषेखालची लोकं देखील सामान्य जीवन जगू शकतील’, असं देखील त्यांनी नमूद केलं. इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना लिपकिन यांनी चीनचं समर्थन केलं आहे. ‘कोरोना व्हायरस चीनने आपल्या प्रयोगशाळेत बनवला आहे या दाव्यात अर्थ नाही. हा व्हायरस वटवाघुळांमुळेच पसरला आहे’, असं ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -