घरCORONA UPDATEकोरोना, मंकीपॉक्स, टोमॅटो फ्लू, मर्सपासून ते Norovirus पर्यंत; जगभरात 'या' 8 व्हायरसचा...

कोरोना, मंकीपॉक्स, टोमॅटो फ्लू, मर्सपासून ते Norovirus पर्यंत; जगभरात ‘या’ 8 व्हायरसचा कहर

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोना व्यतिरिक्त अनेक गंभीर आजार वेगाने पसरत आहेत.

दोन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी कोरोना महामारीचा  प्रभाव अद्यापही दिसून येत आहे. या कोरोना महामारीत अनेक गंभीर आजारांचा सामना देखील जगभरातील नागरिकांना करावा लागला. तज्ज्ञांनी आधीच इशारा दिला की, कोरोनाची ही शेवटची महामारी नाही. अशा परिस्थितीत नवीन व्हायरस उदयास आल्यास जगावर आणखी एक महामारीचा धोका निर्माण होऊ शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोना व्यतिरिक्त अनेक गंभीर आजार वेगाने पसरत आहेत. यात जगातील 27 देशांमध्ये मंकीपॉक्सची सुमारे 800 रुग्ण नोंदवले गेले. याशिवाय 33 देशांमध्ये लहान मुलांमध्ये तीव्र हिपॅटायटीसची 650 प्रकरणे नोंदवली गेली.

- Advertisement -

भारतात कोरोना व्यतिरिक्त इतर आजारही वेगाने पसरत आहेत. विशेषत: केरळमध्ये टोमॅटो फ्लू, वेस्ट नाईल फीवर, स्वाइन फ्लू आणि नोरोव्हायरस आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत, तर अनेकांचा मृत्यूही होत आहे.

जगभरात कोणते व्हायरस पसरत आहेत?

1. मंकीपॉक्स : जागतिक आरोग्य संघटनेनुसार 2 जूनपर्यंत जगातील 27 देशांमध्ये मंकीपॉक्सचे (Monkeypox) 780 रुग्ण आढळून आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे ज्या ठिकाणी हा व्हायरस एंडेमिक स्टेजवर नाही अशा ठिकाणी हा व्हायरस पसरत आहे. तसेच झपाट्याने वाढत आहे. 29 मे पर्यंत मंकीपॉक्स व्हायरसची 257 प्रकरणे नोंदवली गेली, तर 2 जूनपर्यंत हीच संख्या 780 वर पोहचली. मात्र या आजारामुळे आतापर्यंत एकाचाही मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे.

- Advertisement -

2. Hemorrhagic फीवर : हा आजार इराकमध्ये पसरत आहे. त्याचे पूर्ण नाव क्रिमियन-कॉंगो हेमोरेजिक फिव्हर (Crimean-Congo Hemorrhagic Fever) आहे. 1 जानेवारी ते 22 मे पर्यंत या आजाराचे 212 रुग्ण आढळले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. हा रोग संक्रमित प्राणी खाल्ल्याने किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरतोय.

3. तीव्र हिपॅटायटीस : जगातील 33 देशांमध्ये तीव्र हिपॅटायटीसची 650 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. (Hepatitis) सध्या हा आजार लहान मुलांमध्ये पसरत आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, यावेळी हा आजार अधिक गंभीर आहे आणि त्यामुळे मुलांमध्ये यकृत निकामी होत आहे.

4. स्वाइन फ्लू : 11 मे रोजी जर्मनीमध्ये स्वाइन फ्लू (H1N1) चा एक रुग्ण आढळल्याची नोंद करण्यात आली होती. नॉर्थ राईन-वेस्टफेलियामध्ये हे प्रकरण समोर आले. मात्र त्यानंतर येथे एकही प्रकरण समोर आलेले नाही. भारतातही केरळमधील कोझिकोडमध्ये 12 वर्षीय मुलीचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.

5. मर्स : मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) चा पहिला रुग्ण 2012 मध्ये नोंदवला गेला. हा व्हायरस देखील कोरोना व्हायरसच्या कुटुंबातील एक व्हायरस आहे. मात्र या व्हायरसमुळे 850 हून अधिक मृत्यू झाले आहेत. नुकतेच ओमानमध्ये एका ३४ वर्षीय व्यक्तीला या व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले. यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्या 6 जवळचे आणि 27 आरोग्यसेविकांना वेगळे करण्यात आले.

भारतातही पसरतायत हे व्हायरस

1. वेस्ट नाईल ताप: गेल्या महिन्यात केरळमध्ये वेस्ट नाईल फिव्हरमुळे एका 47 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तीन वर्षांनंतर केरळमध्ये या व्हायरसमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यापूर्वी 2019 मध्ये त्याचा मृत्यू झाला होता. वेस्ट नाईल ताप हा डासांच्या माध्यमातून मानवांमध्ये पसरतो. (West Nile Fever)

2. टोमॅटो फ्लू: केरळच्या कोल्लम जिल्ह्यात गेल्या महिन्यात 80 मुलांना टोमॅटो फ्लूची लागण झाल्याचे आढळून आले. या आजाराची लागण झाल्यावर शरीरावर लाल ठिपके तयार होतात, म्हणून त्याला टोमॅटो फ्लू म्हणतात. लहान मुलांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. (Tomatos Flue)

3. नोरोव्हायरस : केरळमध्येच नोरोव्हायरसचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. तिरुअनंतपुरममधील दोन शाळकरी मुलांमध्ये हा संसर्ग आढळून आला आहे. उलट्या आणि जुलाब ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर 12 ते 48 तासांनंतर लक्षणे दिसू लागतात. हे एक ते तीन दिवसात बरे होऊ शकते, परंतु काहीवेळा तो गंभीर आजार देखील ठरतो. (Norovirus)


अरब देशातील कचराकुंड्यांवर मोदींचा फोटो, काँग्रेस नेत्यांनी केला निषेध


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -