घरदेश-विदेश'या' देशात व्हिसाशिवाय फिरा बिनधास्त; ही सवलत मिळणार

‘या’ देशात व्हिसाशिवाय फिरा बिनधास्त; ही सवलत मिळणार

Subscribe

भुटान हा भारताचा शेजारी देश आहे. येथे जाण्यासाठी व्हिसाची गरज लागत नाही. पासपोर्ट किंवा अन्य अधिकृत ओळखपत्रावर भुटानमध्ये जाता येते. भुटान हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तेथील नैसर्गिक सौदर्य आकर्षित करणारे आहे. मात्र येथे जाण्यासाठी पर्यटन परवाना आवश्यक आहे. भुटानमधील खूप शहरांना पर्यटकांची पसंती आहे.

नवी दिल्लीः परदेशात फिरायला जाण्यासाठी व्हिसा बंधनकारक आहे. त्याशिवाय परदेशातील ट्रिपचे नियोजन करता येत नाही. मात्र काही देशांमध्ये फिरायला जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही. मकाओ, माॅरिशयस या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या देशांमध्ये विना व्हिसा जाण्याची मुभा आहे. तसेच भुटान, इंडोनेशिया, जमैका, सेंट किट्स व नेविस, ट्युनिशिया या देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसा लागत नाही.

भुटान हा भारताचा शेजारी देश आहे. येथे जाण्यासाठी व्हिसाची गरज लागत नाही. पासपोर्ट किंवा अन्य अधिकृत ओळखपत्रावर भुटानमध्ये जाता येते. भुटान हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तेथील नैसर्गिक सौदर्य आकर्षित करणारे आहे. मात्र येथे जाण्यासाठी पर्यटन परवाना आवश्यक आहे. भुटानमधील खूप शहरांना पर्यटकांची पसंती आहे.

- Advertisement -

इंडोनेशियामध्ये भारतातून जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. येथे अधिक कालावधीसाठी जायचे असल्यास व्हिसा लागतो. मात्र अल्पावधीसाठी इंडोनेशियात जाण्यासाठी व्हिसाची गरज लागत नाही. त्यामुळे भारतीय पर्यटक थेट या देशात जाऊ शकतात. जमैका देशात ३० दिवसांसाठी फिरायला जाण्यासाठी व्हिसाची गरज लागत नाही. तेथे विमानतळावर पोहोचल्यानंतर पासपोर्टवर टुरिस्ट व्हिसाची मोहर लावली जाते. त्याआधारावर या देशात ३० दिवसांसाठी फिरता येते.  मकाओमध्येही अशाच पद्धतीने ३० दिवसांसाठी विना व्हिसा फिरता येते. अनेक सेलिब्रेटी मकाओमध्ये पर्यटनासाठी जातात.

सेंट किट्स व नेविस या देशात व्यवसाय करण्यासाठी अथवा पर्यटनासाठी जाण्याकरिता व्हिसाची आवश्यकता नाही. या देशांमध्ये पर्यटनासाठी अधिक सुंदर जागा आहेत. ट्युनीशिया देशात तर तीन महिने विना व्हिसा फिरता येते. मात्र पर्यटनाशिवाय अन्य कारणासाठी या देशांत जायाचे असल्यास व्हिसा बंधनकारक आहे. मॉरिशयसमध्येही तीन महिने विना व्हिसा फिरता येते. मात्र रिटर्न तिकिट व बॅंक खात्यात पुरेसे पैसे असणे आवश्यक आहे. मॉरिशयस श्रीमंत देश असून भारतीयांना या देशाचे आकर्षण आहे.

- Advertisement -

वरील देशांमध्ये फिरण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही. अन्य देशात पर्यटनासाठी जाण्याकरिता मात्र व्हिसा बंधनकारक आहे. व्हिसासाठी अर्ज केल्यानंतर कागदपत्रांची छाननी करुन तो दिला जातो.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -